वेळापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा कृषी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी दुसऱ्यांदा उदय साळुंखे यांची निवड करण्यात आली. याबाबत संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कार्यकाळ संपल्याने मावळते अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी राजीनामा दिला होता. यामुळे ही अध्यक्ष पदासाठी निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी पी. बी. सावंत यांनी घेतली.
यावेळी व्हॉइस चेअरमन राम जाधव, सचिव अजिनाथ शिंदे, बांधकाम समितीचे सभापती हुसेन तांबोळी, संचालक दिलीप कांबळे, दादा मेलगे, राजकुमार ढेपे, सुधीर काशीद, प्रकाश गोटे, संदीप गायकवाड, जयश्री झेंडे, प्रतिभा मुकरे, तज्ञ संचालक विनायक लांबतूरे उपस्थित होते. यावेळी नूतन चेअरमन उदय साळुंखे यांनी सर्व संचालक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सभासद कर्ज मर्यादा पाच लाखांहून सात लाख करण्यात आली, याचे सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng