सोलापूर ( बारामती झटका )
सोलापूर येथे काल दिनांक 18 मार्च 2022 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या प्रधान कार्यालयात सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन मा.श्री. रणजितभैया शिंदे (सदस्य जि. प. सोलापूर) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
यावेळी अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करून मार्गदर्शन व निर्णय घेण्यात आले.त्यामध्ये दूध पंढरीचे दूध व दुग्धजन्य प्रॉडक्ट अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यासाठी जुन्यामशीन मध्ये काही नवीन बदल करून व काही नवीन मशीन संपूर्ण ऑटोमायझेशन पद्धतीच्या घेऊन ते प्रोडक्ट विक्री करताना त्यावरती क्यू आर कोड लावणे, मार्केटिंग , डेअरी ॲप डेव्हलप करून अकाउंट विभागामधूनच सर्व प्रकारची इन्व्हाइस तयार करणे, केगाव ,पंढरपूर, टेंभुर्णी, मोहोळ येथील दूध प्रकल्प या नवीन ॲपसह जोडून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करणे, सोलापूर शहरातील मार्केटिंग करणारे व व सर्व दूध संकलन करणाऱ्या गाड्यांना जीपीएस सिस्टीम बसवणे, बार्शी येथील पशुखाद्य कारखाना भाड्याने किंवा स्वतः चालवणे साठी प्रयत्न करणे, वाशी येथील जागा विक्रीसाठी ई-टेंडरिंगची सर्व तयारी करणे, स्क्रॅप व जुन्या गाड्या विक्रीमधून काही रक्कम उभा करणे, NDDB कडून 10 ते 15 कोटी रुपयाचे वर्किंग कॅपिटल लोनसाठी प्रयत्न करणे, नेट मेटरिंगकरून सोलर प्लांट बसवणे यामुळे जेणेकरून संघाचे वीज बिल झिरो होईल,नाबार्ड कडून कर्ज मिळवून गुजरातवरून कांक्रेज, थारफारकर व गीर या जातीच्या गाई आणून शेतकऱ्यांना वाटप करणे कारण या प्रजातीच्या दुधाला फॅट जास्त असते व याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या भागामध्ये या प्रजातीचे बीज तयार करणे.

अशा विविध विषयांवर सविस्तरपणे चर्चा करून सर्व खातेप्रमुख व एमडी यांना मार्गदर्शन व सूचना केल्या.या बैठकीला गोकुळ दूध डेअरीचे चार्टर्ड अकाउंटंट श्री. फडणीस साहेब, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे एम. डी. श्री. डिग्रजे साहेब व वित्त व लेखाधिकारी श्री. लंगोटे साहेब,संघाचे चार्टर्ड अकाउंटंट श्री. लंगोटे साहेब, संचालक श्री. शंभूराजे मोरे , कोल्हापूरच्या सॉफ्टवेअर कंपनीचे अधिकारी कुंभोजकर , संघाचे एमडी बंडगर साहेब व सर्व खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng