निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज उभा करून संघटन तयार करणार – काकासाहेब मोटे.
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे माळशिरस तालुक्यातील निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज उभा करून संघटन तयार करण्याकरता तालुक्यात भेटीगाठींचा झंझावाती दौरा करणार असल्याचे काकासाहेब मोटे यांनी बारामती झटकाशी बोलताना सांगितले.माळशिरस तालुक्यामध्ये काकासाहेब मोटे यांनी युवकांची फळी उभा केलेली होती. कार्यकर्ता निर्माण करणारा युवा नेता म्हणून काकासाहेब यांच्याकडे पाहिले जाते. तालुक्यामध्ये काकासाहेब मोटे युवा मंचाची स्थापना गावोगाव झाली आहे. तरुणांना अडचणीच्या काळात मदत करून अनेकांचे संसार उभारण्यामध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे. निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून काकासाहेब यांच्याकडे पाहिले जाते.
माळशिरस तालुक्यामध्ये सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. यासाठी तालुक्यातील निष्ठावान व प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज उभा करून पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी लवकरच तालुक्याचा दौरा करणार असल्याचे काकासाहेब मोटे यांनी बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng