केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांचा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचेकडून सन्मान संपन्न.
फलटण ( बारामती झटका )
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी सन्मान केला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस शहरातील युवा नेते आकाश सावंत, अमोल वाघमोडे, ॲड. गणेश सिद युवा पत्रकार स्वप्निलकुमार राऊत, संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी सोलापूर जिल्ह्यातील किसान मोर्चाच्या कार्याची व बाळासाहेब सरगर यांची ओळख करून संपूर्ण कार्याची माहिती सांगितली. त्यावेळेस किसान मोर्चा का बहुत बढीया काम असल्याचे चौहान यांनी समारोपाच्या व्यासपीठावर कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभावेळी उदगारले.

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून जाधववाडी ता. फलटण येथील शुभारंभ लॉन्स येथे केंद्रीय मंत्रालयातील विविध विभागांचे भव्य प्रदर्शन गेली दोन दिवस सुरु असून त्याचा समारोप केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंग चौहान यांच्या शुभहस्ते व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा परिषद सदस्य ॲड. जिजामाता नाईक निंबाळकर, भाजपचे प्रांतिक सदस्य सोलापूर जिल्हा संघटक के.के. पाटील, भाजपचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, ओबीसीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वावरे, सांगोला तालुका अध्यक्ष चेतन केदार, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng