सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा खुडूस ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान.

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सर्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांचा खडूस ग्रामस्थांच्यावतीने खुडूस पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्या वरील सिंगल फेजचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न सोडविला असल्याने दत्तमामांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीने माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नेते मच्छिंद्रआबा ठवरे , खुडूसचे माजी सरपंच एडवोकेट शहाजीकाका ठवरे, पंचायत समिती सदस्य अजय सकट, माजी उपसरपंच डॉक्टर तुकाराम ठवरे, दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी श्रीमंतराजे बनकर , युवा नेते योगेश आनंदराव पाटील, बाबुराव सुरवसे, शिवाजीराव कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खुडुस गावत व वाड्या-वस्त्यांवर सिंगल फ्युज कार्यान्वित करणारे महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता ओमासे साहेब यांचाही सन्मान कार्यालयात शहाजी काका ठवरे अजय सकट डॉक्टर तुकाराम ठवरे यांनी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.


माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच एडवोकेट शहाजी काका ठावरे यांनी खुडूस पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या सह्या केलेले निवेदन 04:12 20 20 रोजी रास्ता रोको करणार असल्याचे पालक मंत्री दत्तामामा भरणे व महावितरणचे कार्यकारी अभियंता ओमासे यांच्याकडे दिले होते त्यावेळी एडवोकेट शहाजी काका ठावरे अजय सकट हनुमंत ठवरे विनायक साठे, शहाजी साठे देविदास तांबवे, सादिक फिरजादे व खुडूस ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौ पल्लवी साठेयांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्यावेळेस कर्तव्यदक्ष सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी महावितरण विभागाला सूचना करून लवकरच सिंगल फेज चा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना केलेल्या होत्या रस्ता रोको करण्या पासून परावृत्त करण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता ओमासे यांनी पत्र देऊन लवकरच आपल्या गावाचा सिंगल फेजचा प्रश्न मिटवू असे लेखी आश्वासन दिले होते. एडवोकेट शहाजीकाका ठवरे यांचा पाठपुरावा सुरू होता गावातील ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय होऊन खडूस व वाड्या-वस्त्या वरील अनेक दिवसाचा प्रलंबित प्रश्न सुटलेला असल्याने जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे.


माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र आबा ठवरे व खुडूसचे कर्तव्यदक्ष माजी सरपंच शहाजीकाका ठवरे या दोन्ही राम लक्ष्मण सारख्या बंधूंनी राजकीय जीवनामध्ये अनेक अडीअडचणी सोडविलेल्या आहेत. निवडणुकीपुरते राजकारण इतरवेळी समाजकारण सुरू असल्याने लोकांना काम निश्चित होण्याची हमी असते. खुडूसकरांनी एकदा केलेली चूक त्यांना कळलेली आहे. भविष्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व इतर निवडणुकीमध्ये निश्चितपणे ठवरे बंधूंच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचे जनतेमधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे आप्पासाहेब देशमुख, आबासाहेब धाईंजे आमने-सामने.
Next articleShould you buy A Operation As well as Wide open Your united medical supply current Business? Ponder Right here 5 Considerations Authentic

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here