सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांची पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठक संपन्न

विकास कामातील अडचणींचा पाठपुरावा केला जाईल – दत्तामामा भरणे

सोलापूर (बारामती झटका)

आज नियोजन भवन, सोलापूर येथील सभागृहात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी, वनविभाग अधिकारी, कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये ना. दत्तामामा भरणे यांनी राज्य शासनाने सन २०१४ मध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी एक हजार 94.89 कोटीचा आराखडा मंजूर केला होता. त्याअंतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शंभर कामांसाठी ४७४ कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली ५१ कामे वगळता अन्य प्रस्तावित असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर पुढील महिन्यात आषाढी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे येतात. त्या सर्व भाविकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील, यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे. या विकासकामात काही अडचणी असतील तर संबंधित विभाग प्रमुख यांनी थेट संपर्क साधावा. त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सांगितले.

सदर बैठकीत ना. भरणे यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार जी १०० कामे प्रस्तावित केलेली आहेत, त्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यातील पूर्ण झालेल्या ५१ कामांची माहिती घेऊन प्रगतीपथावरील १० कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती कामे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच पोलीस विभागाने आषाढी यात्रेदरम्यान लाखोच्या संख्येने येणारे भाविक यांच्यावर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंढरपूर शहरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleलोकप्रिय आ. राम सातपुते यांच्यावतीने कारुंडे विकास सेवा सोसायटीचे बिनविरोध नूतन चेअरमन सूर्यकांत पाटील यांचा सन्मान
Next articleमाळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी पशुखाद्य कारखाना अंतिम टप्प्यात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here