भारतीय जनता युवा मोर्चाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसाला सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद मिळाला…..
मांडवे ( बारामती झटका )
आ. राम सातपुते यांनी स्वतःच्या प्रगल्भ नेतृत्वातून स्वतःच्या कामाच्या माध्यमातून भव्य जनसंपर्कातुन माळशिरस तालुक्यातील वाड्यावस्त्या गाव महानगरे यातील तमाम माणसे जोडली, हे मात्र खरेच आहे. कोथळे, कारुंडे, शिंदेवाडी ते दसुर, संगम ते पिलीव, शिंगोर्णी, बचेरी, जळभावी, तिरवंडी, चाकोरे, सगळीकडे नाव एकच राम सातपुते. आज त्यांचा वाढदिवस लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत मांडवे (50 फाटा) येथे संपन्न झाला. आज चक्क येथे मुंबई, पुणे अशा मोठ्या गावात जेवढी गर्दी नसेल त्यापेक्षा कितीतरी भव्य गर्दी उसळली होती. माळशिरस तालुक्याचे आ. राम सातपुते 3 वर्षांपूर्वी आमदार झाले पण, आज त्यांनी या तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यावर तालुक्यातील जनतेवर जे बेहद्द प्रेम केलं ते आज दिसले.

आळंदी-पंढरपूर पालखी राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र जिकडे पाहावे तिकडे वाहनांची तुफान गर्दी होती. लाखो हितचिंतक भाऊंचे अभिष्टचिंतन करीत होते. गर्दीचा महापूर आला होता. यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्वच काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना ठाकरे गट, मनसे, शेकाप, रासप, रिपाई आठवले गट, स्वाभिमानी सगळ्या सगळ्या पक्षाचे लोक आ. राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी उपस्थित होते. शेजारील पंढरपूर, सोलापूर, बारामती, माढा, करमाळा, बार्शी, मंगळवेढा, सांगोला, माण, इंदापूर, दौड, फलटण आदी तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते. सदाशिवनगर, फोंडशिरस, नातेपुते, माळशिरस, अकलूज, पिलीव, वेळापूर, उंबरे दहिगाव, पिंपरी, मोरोची, खुडूस, तामशिदवाडी, शेंडेवाडी, मेडद, इस्लामपूर, मांडकी, पुरंदावडे यासह सर्व माळशिरस तालुक्याच्या प्रत्येक गावागावातून लाखोंच्या संख्येने नागरिक भाऊंच्या वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यात नेते खूप झाले पण जमिनीवर पाय ठेवत जनतेच्या हृदयाला गवसणी घालणारे अन विकासाचा हिमालय उभा करणारे, 14 गावांना पाणी देणारे, तालुक्यातील सर्व रस्ते, महामार्ग, ग्रामीण मार्ग, बंधारे, तलाव, शाळा, तालीम यासाठी भाऊंचा हात सदैव वर आहे. जनता मनापासून प्रेम करतेय, हे आज सिद्ध झाले. तो आजचा डोळे दिपवणारा जनतेचा महासागर हेच सांगत होता. आता माळशिरस तालुक्याचे वाली म्हणून फक्त राम सातपुते भाऊच नेतृत्व करू शकतात. भव्य दिव्य लाखो जनसागराच्या साक्षीने आजचा वाढदिवस सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न झाला. सत्कार समितीने भाऊंना जेसीबीने हार घातला. आता आ. राम सातपुते यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात तोड नाही. भव्य जनसागराच्या उपस्थितीत हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला. – समाजभूषण सुरेश शेंडे नेते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नेते माळी समाज माळशिरस तालुका नेते, राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
