जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांनी कृती समितीची आढावा बैठक घेऊन शंभर टक्के मोहीम यशस्वी करण्याच्या दिल्या सूचना.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी ऊस तोड कामगार बालकांच्या केले लसीकरण
माळशिरस ( बारामती झटका )
सोलापूर जिल्ह्यात उद्या रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी पल्स पोलिओ मोहिम राबविली जाणार असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्हा कृती दलाच्या बैठकीत या मोहिमेचा आढावा घेऊन मोहीम 100% यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या मोहीमेच्या पूर्वसंध्येला जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी माळशिरस तालुका दौरा करून मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच ऊसतोड कामगारांच्या बालकांचे लसीकरणाची सुरुवात केली. आज रात्री उशिरापर्यंत ऊस तोड कामगार, वीटभट्ट्या तसेच इतर स्थलांतरित कामगार यांच्या पाच वर्षाच्या आतील बालकाचे लसीकरण जिल्हाभरात सुरू झालेले असून जिल्ह्यात ४ लाख ५० हजार लाभार्थ्यांना पोलिओ लसीकरण केले जाणार आहे.
साखर कारखाना कामगारांच्या वस्तीवरील पाच वर्ष आतील बालकांचे लसीकरण प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र पिलिव येथील आरोग्य निरीक्षक श्री. राजू शेख, कुंडलिक करपे , आरोग्य सेवक सचिन पिसे, विकास चव्हाण, सचिन पोटे, तसेच डाटा एंट्री ऑपरेटर रणजीत पाटील, वाहन चालक फाळके, परिचर मुन्ना सय्यद आदी उपस्थित होते.
यामध्ये जिल्हास्तरावर प्रत्येक तालुक्यात एक जिल्हास्तरीय अधिकारी तसेच २२ जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांचे मार्फत पर्यवेक्षण केले जाणार असून उद्या ३००२ ठिकाणी पल्स पोलिओ बूथवर लसीकरण केले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पाच वर्षाच्या आतील बालकांबरोबरच कार्य क्षेत्राबाहेरील पाच वर्षाच्या आतील लाभार्थी ऊस तोड कामगार, वीटभट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, एसटी स्टँड, मंदिरे या ठिकाणीही लसीकरण केंद्राची सोय केलेली असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे.
सन २००० पासून सोलापूर जिल्ह्यात एकही पोलिओची केस निघाली नसून याबाबतचा नियमित सर्वेक्षण आढावाही वेळोवेळी घेतला जातो. – दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर.
पल्स पोलिओ मोहिमेनंतर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढे तीन दिवस घरोघरी जाऊन लसीकरण केले जाणार असून एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याबाबत आदेश दिलेले आहेत. तसेच एक महिन्याच्या आतील जन्मलेले नवजात अर्भकाच्या विशेष नोंदी ठेवण्याबाबत सर्व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. – डॉ. शीतल कुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng