सोलापूर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का ? धैर्यशील मोहिते पाटील


अकलूज ( बारामती झटका )

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 79 हजार 440 शेतकर्‍यांच्या 67 हजार 194.39 हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 60 कोटी 18 लाख 1 हजार 945 रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा प्रस्ताव शासनाला पाठवला होता. मात्र, राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित नुकसान भरपाईच्या यादीतून सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांना वगळले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हे शेतकरी नाहीत का त्यांना का वगळले ? असा संतप्त सवाल शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघाचे चेअरमन भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
जून ते ऑक्टोबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांसह काही ठिकाणी जनावरे, तर काही ठिकाणी वीज, भिंत अंगावर पडून कितीतरी जणांना प्राणही गमवावे लागले होते. जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हातातोंडाला आलेली पिके ऐन काढणीवेळी पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडेच मोडले होते.
अतिवृष्टी बाधित शेतक-यांचे प्रशासनाने पंचनामे करून व मदतीचा प्रस्ताव राज्यशासनास पाठवून देखील संकटात सापडलेल्या बळीराजाला वा-यावर सोडले आहे. शेतक-यांच्या प्रति संवेदना शून्य झालेल्या राज्य शासनाने तत्परता दाखवावी व सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई त्वरीत मिळावी अशी मागणी देखील धैर्यशील मोहीते पाटील यांनी केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleगावाची सेवा, अहोरात्र कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सत्ता नसताना कुटुंबासह दिवाळी केली गोड
Next articleरोहित पवार विचार मंचच्या प्रदेश सचिवपदी विनोद तार्डे यांची आ. पवार यांच्याहस्ते निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here