सोलापूर डिव्हिजन रेल्वे हॉस्पिटलच्या मुख्य नर्सिंग अधिक्षक नसरीन आतार यांना नॅशनल वूमन्स एक्सेल्लंन्स अवॉर्ड जाहिर

माढा (बारामती झटका)

सोलापूर डिव्हिजन रेल्वे हॉस्पिटल कुर्डुवाडी येथे मुख्य नर्सिंग अधिक्षक ( Chief Nursing Superientendent ) म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. नसरीन शकील आत्तार यांना दि. ८ मार्च महिला दिनानिमित्त दिल्ली येथील नॅशनल वूमन्स एक्सेल्लंन्स अवॉर्ड पुरस्कार जाहिर झाला असुन तो पुरस्कार दिल्ली येथे दि. १२/०३/२०२३ रोजी केंद्रीय मंत्री श्री. रामदासजी आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतिमा भावमिक, मेंबर ऑफ पार्लिमेंट नवनीत राणा आदि मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

सन १९९५ पासून रेल विभागात काम करणाऱ्या सौ. नसरीन शकील आत्तार यांनी प्रामाणिकपणे काम करुन रेल्वे आरोग्य विभागात एक वेगळा ठसा निर्माण केला. यापूर्वी सौ. नसरीन आत्तार यांना २००४-०५ साली DRM सोलापुर विभाग यांचेकडून उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला होता. चुल आणि मुल सांभाळून सातत्याने काम करणाऱ्या सौ. नसरीन आत्तार यांच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहिर झाला आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्ये काम करत असताना CMS श्री. माने सोलापुर व DMO श्वेथा मिसाला यांचे मार्गदर्शन लाभले. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबारामती येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यानाचे एकेरी नाव बदलण्याची राष्ट्रीय छावा संघटनेची मागणी…
Next articleपाणंद रस्त्यांची कामे महिनाभरात सुरू करण्यासाठी अचूक नियोजन करण्याचे सीईओ दिलीप स्वामी यांचे आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here