सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त विद्यापीठ सिनेट सदस्यपदी सुरज मस्के यांची निवड.

भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका सरचिटणीस सुरज ज्ञानोबा मस्के यांच्या कार्याची दखल घेऊन निवड

माळशिरस (बारामती झटका)

अकलूज येथील भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्याचे सरचिटणीस सुरज ज्ञानोबा मस्के यांची राज्यपाल नियुक्त सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य पदी निवड झाली आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून गेली दहा वर्षापासून सक्रिय कार्यकर्ता असताना मस्के यांनी विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने करून न्याय मिळवून दिला आहे. २०२२ मध्ये झालेल्या सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीत विद्यापीठ विकासमंचची ग्रामीण भागातील जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी त्यांची सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदी निवड केली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, श्री. महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट वेळापूरचे अध्यक्ष अमृतभैया माने देशमुख, भाजपा तालुका उपाध्यक्ष व वेळापूर विकास सोसायटीचे चेअरमन अमरभाऊ माने देशमुख यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोरोची येथील डॉ. निटवेज ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये पत्रकार दिन उत्साहात साजरा
Next articleOnline marketing Tips to Help You Succeed On line

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here