सोळा लाख फसवणूक प्रकरणी मुकादम पती-पत्नी दोघांविरोधात वाहन मालकांचा गुन्हा दाखल.

नाशिक जिल्ह्यातील माजलगाव येथील गोविंद बोराळे व सीमा बोराळे यांच्या विरोधात माळशिरस तालुक्यातील वाघमोडे बंधू यांचा माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद..

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यातील कण्हेर येथील तिघांना ऊसतोडणीसाठी मजूर देतो असे सांगून सोळा लाखाची फसवणूक करणाऱ्या चिंचगव्हाण तालुका माजलगाव येथील पती-पत्नीवर माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला आहे याबाबत महादेव रामचंद्र वाघमोडे राहणार कण्हेर तालुका माळशिरस यांनी फिर्याद दिली आहे गोविंद अंबर बोराळे व सीमा गोविंद बोराळे राहणार चिंचगव्हाण तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या पती-पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की कण्हेर येथील महादेव वाघमोडे यांचा ट्रॅक्टर ऊस वहातूकीचा व्यवसाय आहे .त्यांचा ट्रॅक्टर ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथे ऊस वाहतुकीसाठी असतो.1 जून रोजी गोविंद बोराळे व त्यांची पत्नी सीमा बोराळे हे वाघमोडे यांच्याकडे आले व तुम्हाला ट्रॅक्टर ऊस गळीत हंगामासाठी 20 मजूर पुरवतो यासाठी 5 लाख 50 हजाराची मागणी केली. त्यातील 1 लाख रुपये अँडवान्स म्हणून वाघमोडे यांनी बोराळे यांना फोन पे वरून पाठविली त्यानंतर बोराळे पती-पत्नीस नोटरी करून 3 लाख रुपये 21 हजार 385 रुपये वाघमोडे यांनी दिले. त्यानंतर बोराळे पती-पत्नीने मजुरांना उचल दिल्याशिवाय मजूर मिळणार नाहीत असे सांगितले. त्यानंतर 11 ऑक्टोंबर रोजी वाघमोडे यांनी लोकांकडून हात उसने पैसे घेऊन 28 हजार 617 रुपये दिले व त्याच दिवशी आय सी आय सी बँक नातेपुते या बँकेत वाघमोडे यांनी बोराळे यास 1 लाख रुपये आरटीजीएस ने पैसे दिले. पैसे देऊनही बोराळे यांनी वाघमोडे यांना मजूर पुरवले नाहीत.
वाघमोडे यांचा भाऊ मोहन वाघमोडे यांनाही बोराळे याने ऊस तोड मजूर पुरवतो म्हणून 5 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली 13 जुलै रोजी बोराळे याने मोहन वाघमोडे यांचे कडून 3 लाख 21 हजार 385 रुपये नोटरी करून घेतले त्यानंतर 11 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 85 हजारा ची मागणी केली व पैसे दिल्याशिवाय मजूर येणार नाही असे सांगितले त्यामुळे वाघमोडे यांनी 11 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 28 हजार रुपये रोख दिले परंतु त्यांनाही मंजूर पुरविले नाहीत. दत्तात्रय विठ्ठल वाघमोडे राहणार कण्हेर यांना बोराळे याने ऊस तोडणीसाठी मजूर पुरवतो म्हणून 5 लाख 50 हजाराची मागणी केली त्यांचेकडून 13 जुलै रोजी 3 लाख 21 हजार 385 रुपये नोटरी करून घेतले व 11 ऑक्टोंबर रोजी 2 लाख 28 हजार रोख घेतले परंतु ऊस तोड मजूर पुरवले नाहीत त्यामुळे माळशिरस पोलीस स्टेशन येथे 16 लाख 50 हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा बोराळे पती-पत्नी यांच्यावर दाखल झाला आहे याचा तपास माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बी. बी. थोरात व डी बी थोरात करीत आहेत.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची ऊस तोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादम यांच्याकडून वारंवार फसवणूक केली जात आहे अनेक वाहन मालकांवर मुकादम यांनी वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे नोंद केले आहेत माळशिरस तालुक्यातील वाघमोडे परिवार यांनी मुकादम यांच्यावर गुन्हा नोंद करून मुकादम यांच्या गैरकारभाराला आळा बसणार आहे. माळशिरस पोलीस स्टेशनच्या कारवाईवर अनेक वाहन मालकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसदाशिवनगर साखर कारखान्याचे प्रशासन व उपोषण कर्ते शेतकरी यांच्यात बैठक सुरू.
Next articleधैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे महाळुंग श्रीपूर नगरपंचायतची निवडणूक जबाबदारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here