सौ. लीलावती फत्तेसिंह कदम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

शिक्षण प्रसारक मंडळाचे सेवानिवृत्त शिक्षक फत्तेसिंह उर्फ प्रकाशराव कदम यांना पत्नीवियोग.

शंकरनगर ( बारामती झटका )

सौ. लीलावती फत्तेसिंह कदम रा. स्वरूपनगर, यशवंतनगर (अकलूज), ता. माळशिरस यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान अकलूज येथील रुग्णालयात सोमवार दि.6/12/2021 रोजी रात्री 10:45 वा. दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अकलूज येथील अकलाई स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात आला. रक्षाविसर्जन (तिस-याचा) बुधवार दि. 8/12/2021 रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाचे सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षक पतसंस्थेचे संचालक फत्तेसिंह कदम यांच्या त्या धर्मपत्नी होत्या. त्यांचे मुळगाव मळोली आहे परंतु, नोकरीनिमित्त सदाशिवनगर, अकलूज येथे ते वास्तव्यास होते. सध्या शंकरनगर येथील स्वरूपनगर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. विक्रम व वैभव यांच्या त्या मातोश्री होत्या. तर श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त इंजिनियर प्रदीपसिंह कदम व विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह कदम यांच्या त्या भावजय होत्या. स्व. लीलावती कदम यांच्या दुःखद निधनाने मळोली, तांदुळवाडी, घुमरा वेळापूर, विजयवाडी येथील गावावर दुःखाची शोककळा पसरली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप्रो. डॉ. सुभाष वाघमारे यांनी कवितेच्या माध्यमातून मांडले वास्तव…
Next articleЧто такое шорт и лонг на бирже криптовалют! Сделки простыми словами!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here