स्त्रियांनी आता सावित्रीबाईंप्रमाणे रणरागिणी व्हावे – ॲड. रवींद्र पवार

सातारा (बारामती झटका)

पुण्यात मुलींच्या शाळेत शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाई यांच्यावर शेणफेक करणारे अनेक होते. पण ज्या दिवशी एक धटिंगण, सावित्रीबाई रस्त्याने जात असताना त्यांच्या
पुढे उभा राहिला. त्यावेळी सावित्रीबाईनी थोबाडीत देऊन त्याचे मुस्काड फोडले होते. त्यामुळे बाकीचे त्रास देणारे पळून गेले. स्त्रियांनी शांत, सालस, संयमी असावे हे म्हणणे ठीक असले तरी आपल्यावर वेळ आल्यावर सावित्रीबाईप्रमाणे रणरागिणी व्हायला हवे, असे विचार रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य ॲड. रविंद्र पवार यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर भवन जवळील उद्यानात कॉलेजच्या शिवविजय २०२०-२१ या वार्षिक अंकाचे प्रकाशन करताना बोलत होते. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या शिवविजय या अंकाचे मुखपृष्ठ हे पुढच्या काळात स्त्रियांनी स्वसंरक्षण कौशल्ये शिकून स्वतःचे संरक्षण स्वतःच करावे, अशा आशयाचे आहे, त्याचा संदर्भ देत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेन्जिग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर होते. तसेच या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संस्थेचे ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव मा. संजय नागपुरे इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, शिवविजय हा आपल्या महाविद्यालयाचा अंक हा आठवणींचा सुंदर असा ठेवा आहे. मी या कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. माझे विद्यार्थी जीवन सतत माझ्या डोळ्यासमोर आठवत राहते. कॉलेज कॅन्टीन त्यावेळी टपरीवजा होते. मित्रांच्या समवेत नाश्ता करतानाचे दिवस अजूनही आठवतात. मला शिकवायला डॉ. द. ता. भोसले होते. उणउणे बापू होते. त्यावेळी मी मराठी हा विषय घेऊन छ. शिवाजी कॉलेजमध्ये बी.ए.झालो. संत वाड्मयाचा इतिहास सर शिकवायचे अजून आठवतो. मी देखील ‘प्रतापगडच्या वाटेवर’ हा लेख त्यावेळी लिहिला होता. माझे वय आता ७७ च्या पुढे झाले आहे. अजूनही या कॉलेजला आल्यानंतर माझ्या आठवणी जाग्या होतात. विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात समरस होऊन ज्ञान घ्यावे, जीवन घडवावे. आपण कॉलेजमध्ये खेळलेले खेळ असो, केलेला अभ्यास असो, शिक्षकाविषयीचा आदर असो, कमवा आणि शिकामध्ये केलेले काम असो, हे सारे दिवस डोळ्यात तरळत राहतात. या कॉलेजला जे हवे ते द्यायची माझी तयारी आहे, विद्यार्थ्यानी कौशल्य आत्मसात करून जीवन घडवावे आणि कॉलेजला कधीही विसरू नये, असे भावूक होऊन ते म्हणाले.

अनौपचारिकरित्या झालेल्या या कार्यक्रमात अंक चांगला काढल्याबद्दल संपादक डॉ. सुभाष वाघमारे व समितीतील सदस्य डॉ. कांचन नलवडे, डॉ. सादिक तांबोळी, डॉ. बाबासाहेब कांगुणे, डॉ. पोर्णिमा मोटे, प्रा. विजया गणमुखी, डॉ. संजयकुमार सरगडे, प्रा. उर्मिला तांदळे, प्रा. उषादेवी घाडगे, प्रा. तायराश गुप्ता बागवान, प्रा. जयराम सोनटक्के, विद्यार्थी संपादन सदस्य, कु. समीक्षा चव्हाण, ऋतुजा पाटील, वैभव शेडगे, शिवाजी बांदल यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रोशनआरा शेख, डॉ.रामराजे माने देशमुख, प्रबंधक डॉ.अरुणकुमार सकटे, डॉ. शिवाजी पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. गणेश पाटील ग्रंथपाल झावरे इत्यादी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleप.पू. सदगुरु श्री डॉ. भाईनाथ महाराज पादुका सोहळ्याचे गुरुवारी प्रस्थान
Next articleदेवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बाल्हेगाव विकास योजनेचे वर्च्युअल उद्घाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here