स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे – डॉ. प्रकाश पांढरमिसे

सपकळवाडी ( बारामती झटका )

इंदापूर तालुक्यातील आदर्श गाव म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सपकळवाडी येथे श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भवानीनगरचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांना “आजची तरुणाई” या विषयावर व्याख्यानपर मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी ते म्हणाले, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने भवानीनगर सारख्या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा भवानीनगर सणसर, सपकळवाडी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होतो. आहे. त्याचा अधिकाधिक लाभ विद्यार्थ्यांना होतो आहे. या विद्यार्थ्यांनी शिकून मोठे व्हावे व महाविद्यालयासह संस्थेचे व आपल्या गावाचे नाव मोठे करावे. आजच्या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. तरच वाढत्या स्पर्धेच्या युगात तुम्ही टिकू शकाल.

आजच्या तरुणाईने ज्यांच्या हाती शून्य होते. या शून्यातून विश्व निर्माण केलेल्या कर्तबगार व्यक्तींच्या यशोगाथा, जीवनगाथा वाचल्या पाहिजेत. उदात्त ध्येयाने झपाटलेल्या माणसांकडे पाहा व आकर्षित व्हा. तरच आयुष्याला यशस्वी गवसणी घालता येईल. आजच्या तरुणाईने महापुरुषांचा भूतकाळ जरूर वाचावा. या भूतकाळाचा वर्तमान बनवावा. तोच येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भविष्यकाळ होईल. सळसळत्या रक्ताला अशक्य असं काहीच नसतं. युवा या शब्दाला उलटा करा तो वायू होतो. जो वायूच्या वेगाने जाऊन प्रगतिकारक परिवर्तन घडवू शकतो. ती जिद्द प्रत्येकाने अंगी बाळगली पाहिजे.

आजच्या या तरुणाईने ‘नाचण्या’ ऐवजी ‘वाचण्याला’ जर महत्व दिलं तर खूप मोठं परिवर्तनमय परिवर्तन होऊ शकतं. आजच्या या महाकाय स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर तरुणाईने ज्ञानाच्या विविध क्षेत्रात यश आणि संशोधन संपादित केले पाहिजे. असे मत डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब चव्हाण यांनी केले यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील 6 दिवसात केलेल्या कामाचा अहवाल सादर करताना गावकऱ्यांनी केलेले सहकार्य ही आमच्यासाठी खूप मोठी पावती आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सपकळवाडी गावचे उपसरपंच आणि पुणे जिल्हा नियोजनाचे सदस्य सचिन सपकळ, राष्ट्रवादी युवक कार्यकर्ते तुषार सपकळ व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. प्रगती खाडे हिने केले तर विद्यार्थी सिद्धार्थ पवार यांनी आभार मानले. यावेळी प्रा. बनसोडे मॅडम, तरंगे मॅडम, जाधव मॅडम, दोशी सर, अडागळे सर, भोईटे सर आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनीं उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्रीमंत खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आझाद मैदानावरील आमरण उपोषणास माळशिरस तालुका सकल मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा.
Next articleमाणसातील देव माणसाला वाढदिवसानिमित्त लहानथोर मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here