स्मृती क्रिकेट क्लबच्या वतीने शिवपुरी येथे भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ. गोपीचंद पडळकर आ. राम सातपुते धैर्यशील मोहिते-पाटील , अर्जुंनसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीत उद्योजक दत्तात्रय शेळके यांना आदर्श समाजरत्न पुरस्काराचे वितरण.

उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या सहकार्यातून शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन – श्रीकेशभैया वरुडे.

एकशिव ( बारामती झटका )


एकशिव तालुका माळशिरस येथे स्मृती क्रिकेट क्लब व श्रीकेशभैय्या वरुडे मित्रपरिवार यांच्या वतीने उद्योजक दत्तात्रय शेळके यांच्या सहकार्याने शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक भव्य नाईट पेप्सी बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दीपावली निमित्त बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर 20 21 रोजी सायंकाळी सहा वाजता शुभारंभ प्रतापसिंह मोहिते पाटील विद्यालय समोर शिवपुरी ( एकशिव) येथे होणार असल्याचे श्रीकेशभैय्या वरुडे यांनी बारामती झटक्याशी बोलताना माहिती दिली.
भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी प्रवेश फी 1001 रुपये राहणार आहे प्रथम पारितोषिक 210 21 रुपये व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक पाच फूट उंचीचा, द्वितीय पारितोषिक 15015 रुपये व शहाजीदादा चषक चार फोटो उंचीचा, तृतीय पारितोषिक 11011 रुपये व शहाजीदादा धायगुडे सरपंच चषक तीन फूट उंचीचा, यासह फायनल वैयक्तिक बक्षीस मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज ,सलग सहा षटकार ,उत्कृष्ट झेल ,सलग सहा चौकार ,उत्कृष्ट खेळाडू यासाठी प्रत्येकी रक्कम रुपये 2101 व चषक देण्यात येणार आहे.


भव्य नाईट पेप्सी बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दिनांक 13 नोव्हेंबर 20 21 रोजी सायंकाळी सहा वाजता विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, उद्योजक दत्तात्रय शेळके, एकशिवचे सरपंच शहाजीदादा धायगुडे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार सोनवलकर, इंन्स्ट्रक्टर मार्शल कॅडेट फोर्सचे सिंहान : राजू गोसावी ,साई इंटरप्राईजेस पुणेचे सतीशतात्या ढेकळे,शुटींगबॉलचे कर्णधार आमीर काझी माळशिरस आद्य क्रांतिवीर भावी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लखनभाऊ चव्हाण, उपाध्यक्ष संजयभाऊ चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्ष अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बशीरभाई काझी, मार्शल कॅडेट कोर्स चे संचालक गणेश बोराटे सर, आकुर्डी चे उद्योजक प्रवीण शेठ पांढरकर, विजय सोप इंडस्ट्रीजचे व पिरळे गावचे सरपंच संदीप रामलिंग नरोळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात एक्शिव ग्रामस्थांच्या वतीने आदर्श समाजरत्न पुरस्कार उद्योजक दत्तात्रय शेळके यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरच्या क्रिकेट स्पर्धा रज्जाक आतार सर महेश दादा खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सहकार्य महिंद्रा अँड महिंद्रा, भाजपचे तालुका उपाध्यक्ष भारत रुपनवर, भगवानआप्पा पाटील, राजाभाऊ पाटील, डॉक्टर सचिन पाटील, नवनाथ रुपनवर, लक्ष्मण रुपनवर, बाजीराव खताळ, अनिल पाटील ,निकेतन साळवे, दत्ता कांबळे, रणजीत पाटील, पोपट जाधव, अमोल पाटील, निवेदन औदुंबर बुधावले सर, विठ्ठल सूर्यवंशी सर ,अमोल सुळ सर, सुनील खंडागळे सर, अतुल जाधवर सर, यांचे विशेष सहकार्यातून संपन्न होणार आहे .तरी इच्छुकांनी इरफान मुलांनी 9284466154, श्रीकेश वरुडे 9545730092, महेश कांबळे 8208081906. प्रतीक वरुडे 9890470470 या नंबरची संपर्क साधावा क्रिकेटचे सर्व नियम व अटी राहणार असून स्पर्धेमध्ये बदल करण्याचे अधिकार कमिटीकडे राखून ठेवलेले आहेत फायनल संघास दत्तात्रय शेळके साहेब व सतीश तात्या ढेकळे यांच्या वतीने टी-शर्ट देण्यात येणार आहे . सदर स्पर्धेचे आयोजक श्रीकेशभैय्या वरुडे व मित्रपरिवार शिवपुरी यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकार महर्षी चारिटेबल हॉस्पिटल ट्रस्टच्या जागेचा ताबा घेण्याच्या हालचाली वाढल्या.
Next articleवेळापूर विकास सोसायटीने राज्यात आदर्श निर्माण केला – माधवराव माने देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here