माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य फोंडशिरस गावचे माजी सरपंच मधुकर पाटील यांच्यावर ५२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव.

फोंडशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य फोंडशिरस गावचे माजी सरपंच ज्यांनी स्वकर्तृत्वावर समाजात प्रतिष्ठा निर्माण केली. समाजामध्ये वागत असताना स्वच्छ विचारधारेचा अवलंब करून राजकारणात यशस्वी होऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करून समाजाची सेवा करणारे आदर्शवत व्यक्तिमत्व मधुकर पाटील उर्फ मधुभाऊ यांच्यावर ५२ व्या वाढदिवसानिमित्त अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मधुकर पाटील यांना ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मारकड, युवा उद्योजक शंकर विरकर व युवा पत्रकार सचिन रणदिवे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये फोंडशिरस या गावाला वेगळे महत्त्व आहे. या गावाशी आठ ते दहा गावांचा दैनंदिन कामासाठी संबंध येत असतो. अशा गावांमध्ये आसपासच्या गावांना आपल्या विचाराचा माणूस म्हणून मधुकर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. मधुकर पाटील यांचे पूर्वीपासून राजकीय घराणे आहे. राजकारणामध्ये व समाज कार्यामध्ये नेहमी पाटील परिवार यांचा सहभाग असतो. मधुकर पाटील यांनी समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. माळशिरस तालुक्याच्या प्रस्तापित सत्तेच्या विरोधात राहून यशस्वी राजकारणी झालेले आहेत. त्यांच्याकडे माळशिरस पंचायत समितीचे सदस्य फोंडशिरस गावचे सरपंच पद होते. गेल्या पाच वर्षांमध्ये 44 फाटा या ठिकाणी धुळदेव पाणीवापर संस्था निर्माण करून परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. राजकारणामध्ये काही मिळवण्यासाठी पदाचा कधीच वापर केला नाही. जनतेच्या हितासाठी पदरमोड झाली तरी चालेल, अशा पद्धतीची समाजामध्ये मधुकर पाटील यांची वागणूक आहे. फोंडशिरस पंचक्रोशीमध्ये मधुकर पाटील यांनी विश्वास संपादन केलेला आहे. अनेक लोकांच्या अडीअडचणी सामाजिक राजकीय व घरगुती अडचणी सोडविल्या आहेत. त्यामुळे अनेक परिवाराचे ते सदस्य बनलेले आहेत. भाऊंच्या शब्दाला किंमत आहे. अनेकवेळा संघर्ष करावा लागला तरी ते पाठीमागे हटलेले नाहीत. संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा सुसंस्कृत सर्वगुणसंपन्न असणाऱ्या मधुकर पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मधुकर पाटील यांना बारामती झटका परिवार यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा. मधुभाऊ यांना उदंड आयुष्य, आरोग्य, धनसंपदा लाभो हेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेस साकडे. हितचिंतक श्रीनिवास कदम पाटील संपादक. बारामती झटका परिवार यांचेकडून लाख लाख शुभेच्छा.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng