स्वयंभू फाउंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिर व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आ. राम सातपुते यांच्या शुभहस्ते संपन्न.


स्वयंभू फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी, हवेली यांच्यावतीने माळशिरसचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्तीचा सन्मान सोहळा संपन्न.

पुणे ( बारामती झटका )

स्वयंभू फाऊंडेशन व भारतीय जनता पार्टी, हवेलीच्यावतीने माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार रामभाऊ सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी स्वयंभू फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबीर व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळयाचे उदघाटन आमदार रामभाऊ सातपुते व पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते करण्यात आले.


सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी पुणे महानगर पालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, स्वयंभू फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी हरपळे, नगरसेवक मारुतीआबा तुपे, नगरसेवक संजय तात्या घुले, नगरसेवक उज्वला ताई जंगले, भाजपा पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष राहुलजी शेवाळे, बाबाराजे जाधवराव आदींसह कार्यकर्ते उपस्तिथ होते.
या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे कौतुक करण्यात आले. रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा लोकप्रिय व दमदार आमदार राम सातपुते व पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून करण्यात आले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसिम्बोयासिस युनिव्हर्सिटीचे कार्य कौतकास्पद. – प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी
Next articleशिंदेवाडी येथील युपीएससी उत्तीर्ण शुभम जाधव यांचा माजी उपसभापती किशोरभैया सूळ पाटील यांच्यावतीने सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here