स्वयंभू हनुमान शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 जागा संपादित करून मिळविले दैदिप्यमान यश

नागेशमालक वाघमोडे सत्ताधारी पॅनलचा धुरळा उडवून मतदारांनी पॅनलचा सुपडा साफ केला.

तिरवंडी ( बारामती झटका )

तिरवंडी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित तिरवंडी, ता. माळशिरस या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक 2021-22 ते 2026-27 या सालाकरता निवडणुकीची रणधुमाळी रंगली होती. 13 जागांसाठी 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. स्वयंभू हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांनी दैदीप्यमान विजय संपादन करून नागेश वाघमोडे गटाच्या पॅनलचा धुरळा उडवून मतदारांनी सुपडा साफ केलेला आहे.


स्वयंभू हनुमान शेतकरी विकास पॅनलचे ॲड. राजाभाऊ वाघमोडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेव उर्फ एमडी सरगर, नानासाहेब वाघमोडे सर, शामराव बंडगर, लालासो बाजारे, विकास बंडगर, राजाभाऊ सरगर, मोहन वाघमोडे, कुंडलिक वाघमोडे, सदाशिव वाघमोडे, मच्छिंद्र वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात माने मधुकर हनुमंत 285, पाटील भरत सोपान 275, सरक लक्ष्मण भिकूदास 292, सरगर संतोष ज्ञानेश्वर 299, वाघमोडे भाऊ सदाशिव 280, वाघमोडे हरि नारायण 266, वाघमोडे नारायण शिवराम 260 असे आठ उमेदवार आहेत. महिला प्रतिनिधी गटात वाघमोडे बाळुताई बबन 275, वाघमोडे शालन कुंडलीक 282 अशा दोन महिला आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात बंडगर मारूती विठोबा 298, इतर मागास वर्ग गटात बुद्धे भगवान संभाजी 297, अनुसूचित जाती जमाती गटात सपकाळे शांताबाई येदा 279 असे तेरा उमेदवार आहेत.


सत्ताधारी विरोधी गटात नागेशमालक वाघमोडे, व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान चेअरमन बाळुताई शिवाजी पाटील, तीन माजी चेअरमन त्यामध्ये भाऊ भिवा वाघमोडे, दादा ज्ञानू वाघमोडे, हनुमंत एकनाथ वाघमोडे यांना पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे.
सर्वसाधारण खातेदार कर्जदार गटात बंडगर दयानंद निवृत्ती 216, पाटील दादासो एकनाथ 226, वाघमोडे भाऊ भिवा 238, वाघमोडे दादा ज्ञानू 260, वाघमोडे लक्ष्मण शिवराम 246, वाघमोडे शंकर श्रीपती 234, वाघमोडे वसंत विठोबा 244, वाघमोडे विलास विठ्ठल 247, महिला प्रतिनिधी गटात पाटील बाळू ताई शिवाजी 251, वाघमोडे जिजाबाई भाऊ 243, अनुसूचित जाती जमाती गटात सपकाळे प्रल्‍हाद महादेव 244, इतर मागास वर्गीय गटात मुलांनी शहजान वासू 249, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात वाघमोडे हनुमंत एकनाथ 242 अशी पराभूत उमेदवारांना मते पडलेली आहेत.


सर्वसाधारण गटात वाघमोडे दादा ज्ञानू व वाघमोडे नारायण शिवराम यांना समसमान 260 मते पडलेली होती. चिठ्ठीद्वारे वाघमोडे नारायण शिवराम यांचा विजय झालेला आहे.
सहाय्यक निबंधक कार्यालयाचे केंद्राध्यक्ष के. बी. जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. कोरे, सहाय्यक निवडणूक अधिकारी बी.डी. जरे यांनी काम पाहिले. त्यांना सहकार्य संस्थेचे सचिव विठ्ठल एकतपुरे यांनी केलेले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता माळशिरस पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष घोगरे व संतोष बोत्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


संस्थेची स्थापना दि. 1/5/1925 स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. संस्थेचे सातशे सभासद आहेत. त्यापैकी मतदानाला पात्र 604 सभासद होते, त्यातील 562 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संस्थेचे 50 लाख भाग भांडवल आहे. संस्था सभासदांना डिव्हीडंट वाटत असते. संस्थेची स्वतःची इमारत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी हलग्यांचा कडकडाट व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. वाजत गाजत ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेण्याकरिता सर्व पॅनल प्रमुख व विजयी उमेदवार यांच्यासह मतदार व ग्रामस्थ रवाना झाले.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजय हनुमान पॅनलच्या शोभाताई सिद व जय श्रीराम पॅनलच्या सौ. पुष्पावती पालवे यांच्यात समोरासमोर लढत.
Next articleमांडवे पोटनिवडणुकीत तानाजी पालवे गटाच्या सौ. शोभाताई सिद यांचा दैदिप्यमान विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here