महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्याकडे तक्रार दाखल करणार, आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. पीडित महिलेची दुर्दैवी कहाणी.
वेळापूर ( बारामती झटका )
स्वराज्य रक्षक करियर अकॅडमी चे मालक श्री प्रवीण अभिमन्यू घुले राहणार शिरवली तालुका बारामती जिल्हा पुणे त्यांनी यांनी आर्थिक फसवणूक केलेली असून आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे पीडित महिला सौ. सुनिता संतोष बाबर महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ . रूपालीताई चाकणकर यांच्याकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याचे सांगितले.
वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळा शेजारी सौ सुनीता संतोष बाबर कायमचे राहत आहेत त्यांचा खाजगी खानावळ मेस व्यवसाय आहे. त्याच्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत असते. वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी स्थळावर मोठे पटांगण आहे या ठिकाणी श्री प्रवीण अभिमन्यू घुले राहणार शिरवली तालुका बारामती यांनी स्वराज्य रक्षक करिअर अकॅडमी सुरू केली होती सदर ठिकाणी मुलांना भरतीपूर्व प्रशिक्षण पोलीस भरती, मिलिटरी भरती नेव्ही, तलाठी, बीएसएफ, सीआरपीएफ, एअर ऑफिसर, रेल्वे भरती वनरक्षक , तटरक्षक अशा विविध भरतीसाठी विद्यार्थ्यांची अकॅडमी प्रवीण घुले वेळापूर येथे चालवत होते त्यावेळेस त्यांना सौ सुनिता बाबर यांची मेस असल्याचे समजल्यानंतर त्यांनी 2019 पासून अकॅडमी मधील विद्यार्थ्यांना दोन वेळचे जेवण व नाष्टा देण्यास सुरुवात केली. माफक दरामध्ये सौ सुनीता बाबर यांनी दोन वेळचे जेवण व नाष्टा त्यामध्ये पोहे उकडलेली अंडी असा दिला जात असत. प्रतिमहिना एका व्यक्तीस 2600/- रुपये प्रमाणे मुलांना दर्जेदार घरगुती जेवण मिळत होते एक वर्ष व्यवस्थित हिशोबा प्रमाणे विद्यार्थ्यांकडून घुले सर घेऊन नोव्हेंबर 2020 पर्यंत देत होते मात्र त्यापुढे होणाऱ्या बिला पेक्षा दरमहा कमी कमी रक्कम देऊन आज देतो उद्या देतो पुढच्या वेळेला देतो असे म्हणत लांबवत गेले कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा वेळेच्या वेळेवर नाष्टा व जेवण देण्याचे काम सुरू होते. पहिल्यापासून सौ. सुनीता बाबर यांनी दैनंदिन जेवण केलेल्या विद्यार्थ्यांचे हिशोब ठेवलेले होते थकित रक्कम वाढत चाललेली होती तशी परिस्थिती सौ. सूनिता बाबर यांची परस्थिती गरिबीची त्यांनी नातेवाईक व हातउसने घेऊन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना नाष्टा व जेवण देण्याचे काम सुरू होते. प्रवीण घुले यांना वेळोवेळी पैसे मागितल्यानंतर वेगळीच कारणे सांगत होते यासाठी स्थानिक पुढारी यांच्याकडे पैशाची तक्रार केली होती त्यावेळेस प्रवीण घुले यांनी लवकरच पैसे देतो असे सांगितले होते. वेळोवेळी फोन केले त्यावेळेस त्यांनी पैसे देण्याचे कॉल रेकॉर्डमध्ये नमूद झालेले आहे विद्यार्थ्यांच्या जेवणाचे 2 लाख 80 हजार रुपये ( 2,80,000 ) थकित बिल आहे. तारखेसहित विद्यार्थ्यांच्या नावासह दैनंदिन रेकॉर्ड आहे. आम्ही घरातील कामामुळे वेळेवर जेवण करत नव्हतो मात्र विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण देत होतो तरीसुद्धा आमचा कष्टाचे पैसे घुले सर यांनी ठेवले. असे असताना सदरील अकॅडमी पंढरपूर येथे विसावा मंदिरा शेजारी इसबावी तालुका पंढरपूरयेथे घेऊन गेलेले आहेत त्यांना फोनवर संपर्क केला असता कशाचे पैसे असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे दोन मुले व आजारी पती यांच्यासह सामूहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही .कारण हात उसने घेतलेले पैसे नातेवाईक यांच्याकडून आणलेले पैसे त्यांना गरज असल्याने मागत आहे माझ्याकडे सध्या पैसे नाहीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे प्रवीण घुले यांनी महिन्याच्या महिन्याला पैसे जमा करून स्वतः खर्च केलेले आहेत त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्याकडे तक्रार करणार आहे. त्यांना भेटून सविस्तर झालेला प्रकार सांगणार आहे जर मला न्याय नाही मिळाला माझे कष्टाचे पैसे मिळाले नाहीत तर आमच्या मृत्यूला प्रवीण घुले सर्वस्वी जबाबदार असतील असे चिठ्ठी लिहून आम्ही सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही पीडित महिला सौ .सुनीता संतोष बाबर यांनी केविलवाणी चेहरा व डोळ्यात पाणी आणून सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng