स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्या धर्मपत्नी श्रीमती कांचन डोळस यांनी ढाळे परिवारांचे सांत्वन केले.

दूध संघाचे चेअरमन शहाजी ढाळे यांना पितृशोक.

दसूर ( बारामती झटका )

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय हनुमंतराव डोळस यांच्या धर्मपत्नी श्रीमती कांचन हनुमंतराव डोळस यांनी दसुर येथील ढाळे परिवार यांची सांत्वनपर भेट घेऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कलावती जगन्नाथ डोळस चारीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती कांचन हनुमंतराव डोळस यांनी दसूर येथील संग्राम सोहम दूध संघाचे चेअरमन शहाजी ढाळे यांचे वडील भैरू महादेव ढाळे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते‌. यावेळी श्रीमती कांचन डोळस यांनी ढाळे परिवार यांची सांत्वनपर भेट घेऊन भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. यावेळी किरण सावंत, रवी माने व ढाळे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांच्या राजकीय जीवनामध्ये ढाळे परिवार यांचे मोलाचे सहकार्य होते‌. हनुमंतराव डोळस यांच्या पश्चात ढाळे परिवार यांच्याशी हितसंबंध आजही जोपासलेले आहेत. सुखदुःखात नेहमी डोळस परिवार यांचा सहभाग असतो.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस येथे भव्य रक्तदान व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन
Next articleमाळशिरसचे लोकप्रिय आमदार राम सातपुते महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्रीयन लोकांना सहकार्य करणारे लोकप्रतिनिधी – उद्योजक सुग्रीवदादा निंबाळकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here