राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांना मातृशोक.
माळशिरस ( बारामती झटका )
स्व. इंदिराबाई बाबाराव कडू यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्यावर रविवार दि. १३/०३/२०२२ रोजी सकाळी १० वा. बेलोरा ता. चांदूरबाजार, जि. अमरावती येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या त्या मातोश्री होत्या.
राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या आयुष्याला वेगळे वळण देण्यामध्ये इंदिराबाई यांचा सिंहाचा वाटा होता. जडणघडण व संस्कार करून जनतेची सेवा करीत असल्याने आपल्या मुलाबद्दल अभिमान होता. त्या प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांना मायेची पांघरून घालत असत. सर्व अपंग बांधवांना बच्चु भाऊयांच्या मातोश्रींच्या जाण्याने दुःख झालेले आहे. त्यांच्या दुःखामध्ये श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था व माळशिरस तालुका अपंग प्रहार संघटना सहभागी आहोत, असे संस्थापक अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी सांगितले.
मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री श्रीमती इंदिराबाई बाबाराव कडू यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
माईंना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल गोरख जानकर परिवार
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng