स्वर्गीय इंदिराबाई बाबाराव कडू यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दुःखाचा बांध फुटला…

माळशिरस ( बारामती झटका )

राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांचे दुःखद निधन झाल्यानंतर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दुःखाचा बांध फुटला. अनेक कार्यकर्ते अंत्यविधीसाठी रवाना झाले तर अनेक कार्यकर्त्यांनी कार्यालयात घरी माईंना आदरांजली वाहिली

दि‌‌. 12/3/2022 रोजी 12.45 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली. दि. 13/3/2022 रोजी सकाळी दहा वाजता अंत्यविधीचा कार्यक्रम करण्याचे निश्चित झाला. त्यावेळेस हजारो प्रहार सेवक अमरावती दिशेने प्रवास करीत होते व काही प्रहार सेवक आपापल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम करत होते. माळशिरस तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्याचे दत्ताभाऊ मस्के पाटील, संजीवनीताई बारंगुळे, अजय भाऊ कुलकर्णी, संतोष भाऊ पवार, संदीप भाऊ तळेकर, सागर भाऊ पवार, महेश धोत्रे, समाधान हेमाडे, शहाजी बापू देशमुख, संजय भाऊ पवळ, गोरखभाऊ जानकर, धनाजी भाऊ जाधव, संभाजी गावडे, मंगेश इंगोले, रामचंद्र माने, यादव, पिंटू भोसले, कमलबाई पवळ, वनिता ताई पवळ, अर्चना ताई सावंत, शेतकरी संघटना दता भाऊ भोसले, रयत संघटनेचे लक्ष्मण तात्या गोरड, रनू मिसाळ, दादा गुरव परिवार, सुहास सावंत, प्रहार चालक-मालक संघटना माळशिरस तालुका सर्वांच्या समुहाने प्रहार माळशिरस संपर्क कार्यालयामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाजी उपमुख्यमंत्री विजयदादा यांच्या महत्वपूर्ण कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्णत्वासाठी आमदार रणजितदादांची धरपड.
Next articleसदाशिवनगर येथील धर्मवीर सदाशिवराव माने पाटील पतसंस्थेचा 32 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here