बोंडले (बारामती झटका)
स्वाभिमानी शेतकरी युवक संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित कोडग यांनी वेळापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक यांना बोंडले येथे होत असलेल्या दारूबंदी विषयी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, बोंडले येथील प्राथमिक शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री चालू आहे. परिसरातील विद्यार्थी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत येत असतात. तेथे दारू पिणाऱ्यांची रहदारी सतत चालू असते. याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर होवू शकतो. आणि भावीपिढी हे घातक आहे. त्यामुळे याठिकाणी चालू असलेली दारू विक्री बंद करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng