स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा तालुका कार्यकारिणीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न.
अकलूज ( बारामती झटका )
स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीमध्ये माळशिरस तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलन वीर अजित(भैय्या) बोरकर यांनी जाहीर केलेले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची संघटनेची आढावा बैठक व येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ध्येयधोरणे ठरवण्याकरता अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली
यावेळी स्वाभिमानी चे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष भीमराव फुले, ज्येष्ठ मार्गदर्शक मगन काळे,माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने-देशमुख, तालुकाध्यक्ष आंदोलन वीर अजित(भैय्या) बोरकर, तालुका उपाध्यक्ष दत्ता भोसले माळशिरस विधानसभा प्रमुख साहिल आतार, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवराम गायकवाड, युवा गाडीचे तालुका उपाध्यक्ष सिराज तांबोळी, तालुका कार्याध्यक्ष सचिन देवकते, सचिन पवार समाधान काळे, प्रदीप ठवरे-पाटील, तेजस भाकरे -पाटील साधू राऊत, अक्षय बनगर, अहील पठाण, अतुल पिसे, यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यामध्ये अकरा जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे 22 गण आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व संघटनेवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून न्याय देण्याची भूमिका केलेली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना राजकारणामध्ये सक्रिय होऊन प्रशासनावर वचक निर्माण करण्याकरता शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात जाणे गरजेचे आहे अशी सर्वसामान्य जनता व शेतकरी यांची मागणी असल्याचे कार्यकर्त्यांच्या भाषणांमधून सूर होता.
माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत आहे दोन्हीही पार्टी पैकी कोणीही शेतकरी संघटनेला सामावून घेतल्यास शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी जिल्हाध्यक्ष तानाजी काका बागल यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाईल असे संघटनेच्या बैठकीमध्ये एक मताने ठरलेले आहे. दोन्ही पक्षांच्याविश्वासावर न बसता कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असेही शेवटी ठरलेले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng