अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन
पिसेवाडी (बारामती झटका)
मौजे पिसेवाडी गावातील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सचिन बनकर हे गावातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या वेळेत हजर नसतात. गावातील सामान्य लोकांची अनेक कामे त्यामुळे होत नाहीत. गावातील नागरिकांनी फोन केले असता ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तर देऊन टळाटाळ करत आहेत. त्यामुळे ग्रामसेवकाच्या न येण्याने लोकांची कामे होत नाहीत. त्यामुळे गावातील नागरिक हैराण झाले आहेत.
पिसेवाडी ग्रामपंचायत कार्यालय हे कायमचे बंद कुलपात असते आणि त्यांनी केलेल्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी, या विषयाचे या अगोदर देखील लेखी, तोंडी तक्रारी दिलेले आहेत. तरी देखील या विषयाची पंचायत समिती माळशिरस कार्यालयाने दखल घेतलेली नाही. याचाच भाग म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
याच निवेदनाची दखल घेऊन विस्तार अधिकारी यांनी तोंडी आश्वासन दिले आहे. जर या निवेदनाची तोंडी आश्वासनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याची दखल घेण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng