स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी गायकवाड व म्हेत्रे यांच्यावतीने खुर्च्या व टीपॉय सप्रेम भेट.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर यांच्या दमदार कामगिरीस शेतकऱ्यांनी सढळ हाताने दिला हातभार

विझोरी ( बारामती झटका )

वेळापूर ता. माळशिरस येथील सर्वसामान्य स्वाभिमानी शेतकरी ज्ञानेश्वर रामचंद्र म्हेत्रे यांनी खुर्च्या तर संतोष जगन्नाथ गायकवाड यांनी टीपॉय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुक्यातील विझोरी येथील संपर्क कार्यालयाला दसऱ्यानिमित्त सप्रेम भेट दिलेल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आंदोलनविर अजितभैया बोरकर यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन, उपोषण करून दमदार कामगिरी केलेली असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात बसण्याची अडचण दूर केलेली आहे. शेतकऱ्यांनी सढळ हाताने मदत करून शेतकरी संघटनेला सहकार्य केलेले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजीकाका बागल व विजय रणदिवे यांच्या सहकार्याने माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी लढाई करून आंदोलन वीर अजितभैया बोरकर हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या अडचणीला उभा राहिलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रतिमा माळशिरस तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे.

कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांना व तक्रारी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित बसता यावे, यासाठी ज्ञानेश्वर म्हेत्रे, संतोष गायकवाड यांनी संघटनेला साहित्य दिलेले आहे. सदर साहित्याचे पूजन ॲड. आर. एम. ताटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष अजित भैय्या बोरकर, संघटनेचे मार्गदर्शक डॉ. सचिन शेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा अध्यक्ष साहिल भैय्या आतार, डाॅ. धनंजय म्हेत्रे, जेष्ठ नेते मगन काळे साहेब, विजय काळे, संतोष म्हेत्रे, आकाश म्हेत्रे, निलेश म्हेत्रे, महादेव बनकर, संतोश गायकवाड, समाधान काळे पाटील, साधु राऊत, अहिल पठाण, विजय वाघंबरे आदी कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी सक्तीच्या रजेवर जलजीवन टेंडरच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती स्थापन केली.
Next articleमाळशिरस पंचायत समितीच्या आवारात दसऱ्याच्या मुहूर्तावर दिव्यांग कक्षाची स्थापना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here