पंढरपूर (बारामती झटका)
स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे विद्यार्थी रोहित रमेश बादगुडे (२०२१ मध्ये पास आऊट) यांनी गेट परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षेत (प्रिलियम) देखील यश मिळविले आहे. या दुहेरी यशामुळे बादगुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहित रमेश बादगुडे (रा. शेळगाव आर, ता. बार्शी) यांनी एकाच वेळी दोन परिक्षांत यश संपादन केले असून आता मेन्स परीक्षा बाकी आहे. रोहित बादगुडे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. बारावीला ८५ टक्के गुण मिळवून स्वेरीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली इतर प्राध्यापकांचे अचूक मार्गदर्शन त्याच बरोबर वसतिगृहातील करून घेतला जाणारा अभ्यास, रात्र अभ्यासिका, वेळोवेळी प्रात्यक्षिकावर दिलेला भर या बाबीमुळे अभ्यासाची सवय जडली आणि २०२१ मध्ये गेट परीक्षा दिली. त्यात गेट स्कोर ७३४ (६५.७९), आला आणि भारतात ९०१ रँकने यश मिळविले. पदवी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत असतानाच एमपीएससी स्पर्धा परीक्षेची पूर्व परीक्षा देखील दिली. विशेष म्हणजे दोन्हीही परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळवले. स्वेरीतील स्पर्धा परीक्षा तयारी वर्गाची देखील अभ्यासाला मदत झाली. योग्य मार्गदर्शनामुळे यश मिळत गेले. यशाबद्धल रोहित बादगुडे यांचा सत्कार स्वेरीचे संस्थापक सचिव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्याहस्ते करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी रोहित बादगुडे यांचे अभिनंदन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng