पंढरपूर (बारामती झटका)
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये ‘हाऊ टू राईट फंडिंग प्रपोजल’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
दीपप्रज्वलनानंतर प्रास्ताविकात या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. महेश मठपती यांनी ही कार्यशाळा आयोजित करण्याचा नेमका हेतू स्पष्ट करून या कार्यशाळेपासून होणारे फायदे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पुणे येथील एसबीइएम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक एन.के. बेदरकर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याचे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आवश्यक आहे. समाज उभारणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर हा आवश्यक आहे, हे शासनाने मान्य केलेले आहे. त्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.’ पुढे प्राध्यापकांना संबोधित करताना ते म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देताना शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांकडे ज्ञान, उर्जा आणि उत्साह हस्तांतरित केला पाहिजे.’ स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng