पंढरपूर (बारामती झटका)
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या एम.टेकच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या शब्दाली चारुदत्त देशपांडे, दीपाली वसंत अटकळे आणि शीतल शिवराज मरब यांचे आंतर राष्ट्रीय दर्जा असलेल्या स्प्रिंजर जर्नल मध्ये पेपर प्रकाशित झाले असून याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पेपर प्रकाशित झाले असून अनुक्रमे शब्दाली देशपांडे यांचे ‘फ्युजन ऑफ हँड क्राफ्टेड एज अँड रेसिडेयल लर्निंग फीचर फॉर इमेज कलरायरेशन’, दीपाली अटकळे यांचे ‘मल्टी स्केल फिचर फ्युजन मॉडेल फॉलोड बाय रेसिरीयल नेटवर्क फॉर जनरेशन ऑफ फेस एजिंग अँड डीएजिंग’ आणि शीतल मरब यांचे “ए नॉवेल एज बुस्टिंग अप्रोच फोर इमेज सुपर रिझोल्युशन’ या विषयावर पेपर प्रकाशित झाले आहे. ‘स्प्रिंजर’ हे आंतर राष्ट्रीय दर्जाचे प्रकाशन असून या मध्ये जागतिक दर्जाचे संशोधकांचे पेपर्स प्रसिद्ध केले जातात. ‘स्प्रिंजर’ प्रकाशनाचे हे पुस्तक २०१७ मधील अव्वल २५ टक्के डाऊनलोड झालेल्या पुस्तकांपैकी एक ठरले होते. यात स्वेरीच्या टेक्नोसोसायटल या आंतर राष्ट्रीय परिषदेपासून ‘स्प्रिंजर मध्ये स्वेरीतील विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांचे शोध पेपर्स प्रसिद्ध करत आहेत. त्यातून देशपांडे यांच्या संशोधनातून ‘अशा प्रकारच्या संशोधनामुळे जुने ब्लॅक व्हाय अँड व्हाईट काळातील चित्रपट हे रंगीत चित्रपटामध्ये रुपांतरीत करता येऊ शकते.’, अटकळे यांच्या संशोधनातून ‘वयोगटानुसार प्रतिमा तयार करता येऊ शकते’ तर मरब यांच्या संशोधनातून ‘सुपर रिझोल्युशन हे मेडिकल इमेजिंग, सेक्युरिटी इमेजिंग अँड सॅटॅलाइट इमेजींग या यामध्ये खूप मागणी असून या तंत्रज्ञानामध्ये कमी रिझोलेशनची प्रतिमा ही जास्त रिझोलेशन मध्ये रुपांतरीत करता येऊ शकते. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी तिन्ही विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng