ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा स्वेरीत उपलब्ध
पंढरपूर (बारामती झटका)
‘थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी (पदवी) च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. ०३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झाली असून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरी फार्मसीला फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी. ६३९७) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालणार आहे’, अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. स्वेरी फार्मसीमध्ये सॅनिटायझेशन व सोशल डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया दि. ०३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरु झालेली आहे. थेट द्वितीय वर्ष बी.फार्मसी (पदवी) प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि. १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालेल. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच, थेट द्वितीय वर्ष रजिस्ट्रेशनसाठीचे शुल्क खुला प्रवर्ग – ८०० रु. आणि इतर प्रवर्ग – ६०० रु. असे आहे. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा यामध्ये समावेश आहे. फार्मसी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. रामदास नाईकनवरे (मो. ८३९०९०६१४६) किंवा स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (मो. ९५४५५५३८८८) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आवाहनही करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng