स्वेरीच्या स्वप्निल वसेकर यांची ‘केस पॉइंट’ कंपनीमध्ये निवड

पंढरपूर (बारामती झटका)

‘केस पॉइंट’ या नामंकित कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वप्निल लहू वसेकर यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.

           आय.टी. क्षेत्राशी संबंधीत सुरत (गुजरात) येथील ‘केस पॉइंट’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या स्वप्निल लहू वसेकर यांची निवड करण्यात आली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. त्यामुळे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला आवश्यकतेनुसार विद्यार्थी स्वेरीतून मिळतात त्यामुळे स्वेरीत नित्य कॅम्पस इंटरव्ह्यूव होत असतात. संबधित विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व संबंधित प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या स्वप्निल वसेकर यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशिक्षक समिती मंगळवेढा व सांगोला शाखा संवाद बैठका संपन्न
Next articleपुणे विभागातील 19 लाख 48 हजार 969 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here