पंढरपूर (बारामती झटका)
‘हॅलो डॉक’ या आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील हर्षल विकास रामगुडे यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तंत्रशिक्षणासाठी होत असलेली गैरसोय पाहून सन १९९८ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) मध्ये स्वेरीची स्थापना झाली. तेव्हापासून नवनवीन बदल, उपक्रम राबवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाला योग्य दिशा देण्याचे कार्य स्वेरी करत आहे. हे पाहून आता ग्रामीण बरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील स्वेरीत प्रवेश घेत विकासाकडे झेपावत असल्याचे दिसून येत आहे. मुखई (ता.शिक्रापूर, नवी मुंबई) येथील रहिवाशी असलेल्या हर्षल रामगुडे यांची सॉफ्टवेअरशी संबंधित असलेल्या ‘हॅलो डॉक’ या आंतरराष्ट्रीय कंपनीत ‘सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर–१’ म्हणून नुकतीच निवड झाली. या यशाचे श्रेय ते पंढरपुरच्या स्वेरीतील डॉ. बी.पी. रोंगे सर आणि त्यांच्या प्राध्यापक वर्गाला देतात. नवी मुंबई येथे भारती विद्यापीठमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर सन २०१६ साली रामगुडे यांनी स्वेरी इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग च्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी स्वेरीतील शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासक्रमाला आणि मार्गदर्शनाला विशेष प्राधान्य दिले. त्याचबरोबर स्वेरीच्या वसतिगृहात चारही वर्ष राहून रात्र अभ्यासिकेच्या माध्यमातून करून घेतलेला अभ्यास आणि स्वतः केलेले परिश्रम फळाला आल्याचे ते आवर्जून सांगतात. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करत असतात. संबंधित विद्यार्थ्यांना स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. रामगुडे यांना ‘हॅलो डॉक’ कंपनीत दहा लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले असून त्यांना संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे, प्रा. व्ही.डी. जाधव, प्रा. प्राजक्ता सातारकर, प्रा. अंतोष द्याडे, प्रा.संजिवनी कदम, प्रा. पंकज गायकवाड व इतर प्राध्यापक तसेच प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्हूव मधून निवड झालेल्या हर्षल रामगुडे यांचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng