पंढरपूर (बारामती झटका)
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी) व कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका) मध्ये शनिवार दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने गेस्ट लेक्चर, ॲडव्हरटाईज मेकिंग आणि स्टेट लेवल पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन’ घेण्यात आल्या.
कोरोनामुळे महाविद्यालये दुसऱ्या वर्षीही पूर्णतः बंद आहेत. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येऊ शकत नसल्यामुळे ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ च्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ‘इंडियन फार्मा -ट्रस्टेड फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ या विषयावर राष्ट्रीय दर्जाचे ऑनलाइन पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले.यामध्ये सुरवातीला प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांनी परिषदेबद्दल सविस्तर माहिती दिली. यामध्ये पहिल्या दिवशी ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ या विषयावर प्रियांका भट यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकाळात करिअर करण्याच्या दृष्टीने ‘संवाद कौशल्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा’ या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत हे सांगून व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्व कौशल्य यावर मार्गदर्शन केले तसेच या दिवशी पोस्टर प्रेसेंटेशनची स्पर्धा घेण्यात आली.या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये परिषदेच्या दुसऱ्या दिवशी हैद्राबाद येथील लूटिऊस फार्मासिटिकल प्रा.लिमिटेडचे व्हॉइस प्रेसिडेंट बी. नागाराजु यांनी ‘एव्लॉविंग ट्रेंड्स इन रीसर्च अँड डेव्हलपमेंट’ या विषयावर मार्गदर्शन करताना कंपनीमध्ये असणाऱ्या नवीन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची विशेष माहिती दिली. या दिवशी दुपारच्या सत्रात ‘ऍडव्हरटाइज मेकिंग’ ही स्पर्धा घेतली गेली. यंदाच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाचे बोधवाक्य ‘फार्मसी अल्वेज ट्रस्टेड फॉर युअर हेल्थ’ हे होते. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’ निमित्त ऑनलाईन वेबिनार आयोजन करण्यात आला होता. यामध्ये ‘रिक्रूट द सायंटिस्ट ‘ यावर बोलताना लुटियस फार्मासियुटिकल चे मानव संसाधन प्रमुख आदित्य वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या विविध फार्मा स्किल्स बद्दल व उपलब्ध असणाऱ्या संधीबद्दल महत्वाची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकाचे निराकरण केले. या दिवशी ऑनलाईन राज्यस्तरीय पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकास रोख रक्कम दोन हजार रुपये व उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची रोख दोन पारितोषीके देण्यात आली. यामध्ये पदवी फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक सिद्धी विठ्ठलदास व प्राजक्ता साळुंखे यांच्या पोस्टरला मिळाला तसेच उत्तेजनार्थ क्रमांक म्हणून अक्षता चिंचोली व आकांक्षा शिंदे यांना देण्यात आला तर डि. फार्मसी मध्ये प्रथम क्रमांक आरती माने यांना मिळाला तर सायली काटकर, सोनाली चौगुले व सुरज शिंदे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. हा कार्यक्रम स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.मिथुन मणियार व प्राचार्य सतीश मांडवे यांच्या नेतृत्वाखाली, सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. स्नेहल चाकोरकार, प्रा. सविता शिंपले, प्रा. विजय चाकोते, प्रा.प्रिती कोकाटे, प्रा. वैभव गायकवाड, इतर प्राध्यापकांनी तसेच प्रणोती चव्हाण, प्रतीक जाधव, सुप्रिया खेडकर या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले तर प्रा. रामदास नाईकनवरे यांनी उपस्थितांचे आभार मानून परिषदेची सांगता केली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng