स्वेरीत ‘इम्पॅक्ट लेक्चर सिरीज’ संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल व स्वेरीज् सोबस सेंटर ऑफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने एआयसीटीई व मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेल (एमआयसी) च्यावतीने स्वेरी कॉलेजमध्ये दोन दिवसीय ‘इन्पॅक्ट लेक्चर सिरीज’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यामध्ये समन्वय साधून ‘उद्योजकता व पेटंट’ या बद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ०१ ऑक्टोबर व दि. ११ ऑक्टोबर या दोन दिवस झालेल्या सत्रात सुमारे १२५ प्राध्यापक व चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दि. १ ऑक्टोंबर रोजी पहील्या सत्रात न्युप्लेक्स टॅलेंट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. भूषण केळकर यांनी ‘इंडस्ट्री ४.० टेक्नॉलॉजीज्’ वर बहुमोल मार्गदर्शन केले तर युएसएच्या इनक्युब लॅबचे संस्थापक प्रा. राजेश नायर यांनी ‘बिल्डींग एंटरप्रेनरशिप इकोसिस्टीम इन युनिव्हर्सिटीज अँड इंट्रोडक्शन झिरो टू मेकर प्रोग्राम’ या विषयावर मार्गदर्शन केले. दि. ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या सत्रात बेंगलोरच्या इनो मंत्रा कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक प्रा. लोकेश व्यंकट्स्वामी यांनी ‘डिझाईन थिंकिंग’ यावर आपले विचार मांडले. तर आयईडीसी, एसव्हीकेएमएस नर्सी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ. संतोष बोथे यांनी ‘स्टडीज ऑफ इनोव्हेटर’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर संजीव करपे यांनी ‘बांबू व उद्योजकता’ यावर मार्गदर्शन करून दुर्लक्षित होत असलेल्या उद्योगधंद्याना पुन्हा उभारी आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विद्याराणी क्षीरसागर, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, डॉ. महेश मठपती, प्रा. अविनाश पारखे, प्रा. विद्युलता पाटील आदी प्राध्यापकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी केले तर स्वेरी सोबसचे डॉ. गिरीश संपत यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Next articleपारदर्शक कारभारामुळे माढेश्वरी बँक लवकरच दोनशे पन्नास कोटींचा टप्पा गाठेल – सभापती विक्रमसिंह शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here