पंढरपूर (बारामती झटका)
‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी), कॉलेज ऑफ फार्मसी (पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी) तसेच एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अभियांत्रिकी व फार्मसी मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे येत्या बुधवार, दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लसीकरण शिबिराचे आयोजन केले आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
जागतिक कोरोना महामारीमुळे वर्गातील प्रत्यक्ष अध्ययन व अध्यापन प्रक्रिया बऱ्याच काळापासून बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सुचनेनुसार ऑनलाईन शिक्षण पद्धत अवलंबली होती. आता शासनाच्याच आदेशाने काही अटींचे पालन करून महाविद्यालये सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेशाची परवानगी प्रशासनाने दिली आहे परंतु अजूनही काही विद्यार्थी पहिल्या व दुसऱ्या लसीपासून वंचितच आहेत. या वास्तविकतेचा विचार करून दि. २७ ऑक्टोबर रोजी या लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वेरीच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शिबिरातून लसीकरणाचा फायदा होणार आहे. स्वेरी परिवार अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व स्वेरी परिवार संबंधित सदस्यांना लस देण्याचे आयोजन केले आहे. लसीकरण संबंधी अधिक माहितीसाठी विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील (९५९५९२११५४) व डॉ. महेश मठपती (९५०३०१९९९७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या लसीकरण शिबिरात जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी होवून लसीकरण करून घ्यावे.’ असे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng