पंढरपूर (बारामती झटका)
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘फेस अकॅडमी’ या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्युवमधून स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
एक नामांकित कंपनी असलेल्या ‘फेस अकॅडमी’ मध्ये स्वेरीच्या दोन विद्यार्थीनींची नुकतीच निवड करण्यात आली आहे. फेस अकॅडमी कंपनीच्या निवड समितीने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेतून कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेणाऱ्या अबोली विजय गायकवाड व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोमल तानाजी मोळक या दोघींची निवड ‘फेस अकॅडमी’ कंपनीत करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या संस्कारामुळे विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने झेपावत आहेत. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या दोघा विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng