‘स्वेरी’ च्या दोन विद्यार्थ्यांची ‘रॅपीड सर्कल’ कंपनीत निवड

वार्षिक परीक्षेच्या निकालाबरोबरच स्वेरीची प्लेसमेंटमध्ये देखील आघाडी

पंढरपूर (बारामती झटका)

‘रॅपीड सर्कल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘रॅपीड सर्कल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व च्या विभागातील गौरव दत्तात्रय गुरुजी व इशिता प्रदीप महाजन या दोन विद्यार्थ्यांची निवड केली असून यांना वार्षिक ८ लाख रु. इतके पॅकेज मिळाले आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि नामांकित कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. संबधित विद्यार्थ्यांना पदवीच्या तिसऱ्या वर्षापासूनच विशेष प्रशिक्षकांद्वारे बहुमोल प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली असल्याचे दिसून येते. स्वेरीमध्ये शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. सदर विद्यार्थ्यांना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव, ट्रेनिंगचे अधिष्ठाता प्रा.अविनाश मोटे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त,कॅम्पस इनचार्ज, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून ‘ रॅपीड सर्कल’ कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleशेतकरी संघटना किसान मंचाच्यावतीने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला निवेदन
Next articleमहाळूंग नगरपंचायत निवडणुकीचे भीमराव पाटील उर्फ पाटील नाना यांनी पंधरा उमेदवार निवडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here