स्व. कोंडीबा बिरा गोरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह.भ.प. नंदकुमार महाराज यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.

मनमिळावू, सोज्वळ व्यक्तिमत्व असणाऱ्या नानांच्या पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन.

गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडी गावचे प्रगतशील बागायतदार मनमिळावू व सोज्वळ व्यक्तिमत्व असणारे स्व. कोंडीबा बिरा गोरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार दि. 30/4/2022 रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये ह.भ.प. नंदकुमार महाराज यांचे सुश्राव्य किर्तन गोरडवाडी बिरोबा मंदिर पाठीमागे होणार आहे. तरी मित्र परिवार नातेवाईक यांनी किर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मातोश्री श्रीमती अंजनाबाई बिरा गोरड, धर्मपत्नी श्रीमती बानूबाई कोंडीबा गोरड, कन्या सौ. जयश्री लवटे व सौ. सुजाता मारकड, चिरंजीव नारायण गोरड व समस्त गोरड परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

स्वर्गीय कोंडीबा बिरा गोरड यांना नाना या टोपण नावाने ओळखत होते. नानांनी आयुष्यामध्ये अनेक लोकांना अडचणीच्या काळात मदत केलेली आहे सहकार्य करण्याची भावना होती. समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. नानांना जाऊन वर्षाचा कालावधी होता आला तरीसुद्धा गोरड परिवार यांच्या कायम आठवणीत राहिलेले आहे.
कष्टाने केली आयुष्याची सुरुवात,
सगळ्यावर ठेवला मायेचा हात,
सुख जवळ येताच काळाने फिरवली पाठ,
जन्मोजन्मी पाहतो आम्ही तुमचीच वाट,
पवित्र तुमची स्मृती अनंत तुमची माया,
नित्य असू द्या आमच्या वरती अखंड तुमची छाया,
भाऊ तुमच्या छायेविना सर्वकाही वाटे अपूर्ण,
कोणत्याही धन-संपत्तीने उणीव न होई पूर्ण,
चेहरा होता हसतमुख कधी न दिले कोणास दुःख,
मनी होता भोळेपणा कधी न दाखवला मोठेपणा,
तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होतं,
ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं,
आज सर्व काही असल्याची जाणीव आहे,
फक्त तुम्ही नसल्याची मोठी उणीव आहे,
अजूनही होतो भास तुम्ही आहात जवळपास,
काटे फिरुनी घड्याळ्याचे, कसा घेऊ मागे क्षण,
कष्टातून संसार फुलवला उरली नाही साथ आम्हाला,
आठवण येते क्षणाक्षणाला आजही तुमची वाट पाहतो,
नाना यावे तुम्ही पुन्हा जन्माला…,

शांती लाभो तुमच्या पवित्र आत्म्यास हीच प्रार्थना गोरडवाडीचे ग्रामदैवत श्री बिरोबा देवाला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआजपर्यंत जाईन तिथं राजू शेट्टींचा मुलगा म्हणून मान मिळाला, तो टिकवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन – सौरभ शेट्टी
Next articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार श्रीक्षेत्र अरण येथे माळी समाजाचा मेळावा – कल्याण (काका) आखाडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here