स्व. समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन.

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील समाज भूषण नानासाहेब देशमुख प्रतिष्ठानचे एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूल यांच्यावतीने दि. ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता ‘स्वरगंधा २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते तसेच डॉ. एम. के. इनामदार यांची उपस्थिती असणार आहे.

समाजभूषण नानासाहेब देशमुख यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे सुश्राव्य किर्तन रविवार दि. ६ मार्च रोजी रात्री ८ ते १० या वेळेत नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी आयोजित केली असल्याची माहिती एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक बाबाराजे देशमुख व अध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन एस. एन. डी. इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मामासाहेब पांढरे, रोहीत शेटे, अतुल बावकर, विश्वजीत पिसाळ आणि शृतिका देशमुख यांनी केले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफलटण बाजार समीतीचे चेअरमन स्व. बी. के. भाऊ निंबाळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वरोग निदान आरोग्य शिबीर संपन्न
Next articleप्रदेश संघटक ज्योतीताई कुंभार यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here