मुरबाड (बारामती झटका) गुरुनाथ तिरपणकर यांजकडून
पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि आपणही निसर्गाचे काही देण लागतो या संकल्पनेतून डोंबिवली येथील स. ह. जौंधळे येथील मराठी माध्यमाच्या माजी विद्यार्थ्यांनी माळ गाव, टोकावडे, मुरबाड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला. या माजी विद्यार्थ्यांनी फुलझाडे, फळझाडे व उंच वाढणारी झाडे अशा वेगवेगळ्या रोपट्यांचे वृक्षारोपण केले.
या कार्यक्रमास स. ह. जौंधळे विद्यामंदीर मराठी माध्यमाच्या प्रफुल्ल मोरे, अभिषेक मुणगेकर, नितीन भागीत, विशाल मोरे, स्वप्निल राखेवार या माजी विद्यार्थ्यांसह त्यांचे मित्र अतुल महाजन आणि संदीप महाजन यांनी सहभाग घेतला होता. पावसाळ्यानंतर प्रत्येकी दोघाजणांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांची निगरानी करण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा प्रत्यक्ष जाऊन भेट देण्याचा संकल्प केला आहे. तसेच ठीबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी घालण्याची तरतूद करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng