हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून

राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते मा. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी (दि.२३) रोजी इंदापूर प्रशासकीय भवन येथे दाखल केला. कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयुरसिंह पाटील, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, कांतीलाल झगडे, देवराज जाधव, माऊली बनकर, बाळासाहेब पाटील, अशोक इजगुडे, शकील सय्यद, महादेव घाडगे, गोरख शिंदे, कैलास कदम, बापू जामदार, रंजना शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीप्रमाणे जय्यत तयारी केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांमधून या निवडणुकीसाठी तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्षम कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे हर्षवर्धन पाटील यांचे नियोजन दिसून येत आहे. राज्यातील साखर उद्योग अडचणीत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या कारखान्याची निवडणूक होत आहे. सध्या कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना अडचणीतून बाहेर येत असून राज्यातील पहिल्या टॉप टेन कारखान्यांमध्ये कर्मयोगी कारखान्याचा समावेश करण्याची क्षमता हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वामध्ये असल्याचा विश्वास सभासदांमधून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी शुक्रवार (दि.२४) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचा माळशिरस पंचायत समितीच्यावतीने माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांनी केला सन्मान
Next articleमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय मुत्सद्देगिरी पुढे राष्ट्रवादी हतबल, निवडणुकीतून माघार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here