हॉटेल राजधानी म्हणजे अस्सल गावराण तडक्यासह जेवणाचा उत्तम खजिना…
चवीने खाणार त्याला राजधानी देणार.
हॉटेल राजधानीचे जेवण म्हणजे आरोग्यदायी जेवण होय…
माळशिरस ( बारामती झटका )
सातारा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावर माळशिरसपासून ९ कि.मी. अंतरावर आणि म्हसवडपासून २० कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर गोरडवाडी गावानजिक हॉटेल राजधानी अवतीभवती निसर्गरम्य वातावरण, हिरव्यागार ऊसाच्या शेतात, स्वच्छ मोकळ्या हवेत हे हॉटेल वसलेले आहे. शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर, दर्जेदार जेवणाचा खजिना म्हणून हॉटेल राजधानी प्रसिध्द आहे.

या हॉटेलचे खास वैशिष्ट म्हणजे मांसाहारी जेवणासाठी राजधानी मटण थाळी, भिगवण मच्छी थाळी, चिकण थाळी आणि राजधानी दम बिर्याणी खूप प्रसिध्द आहे. या थाळ्यांसोबत चुलीवर भाजलेली भाकरी, चपाती आणि भट्टीवर भाजलेली रोटी अन् तांबडया पांढऱ्या रस्सासोबत खाताना खूप वेगळाच आनंद मिळतो. येथे ग्राहक सेवा हिच ईश्वरसेवा मानून ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते. त्यामुळे अल्पावधीतच हे हॉटेल ग्राहकाच्या पसंतीचे ठरले आहे. जर ग्राहकांना अस्सल गावराण पूर्ण कोंबडी पार्टीसाठी हवी असल्यास येण्याअगोदर कळविले तर अस्सल गावराण कोंबडी उपलब्ध करुन बनवून दिली जाते. आमच्या हॉटेलच्या जेवणाची चव असंख्य ग्राहकांनी चाखून जेवणाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

मांसाहारी जेवणाबरोबरच शुध्द शाकाहारी जेवणही याच हॉटेलमध्ये अतिशय चविष्ठ, स्वादिष्ट आणि रुचकर दिले जाते. खास येथे बनवण्यात येणारे पदार्थ रिफाईंड तेलात शिजवले, तळले किंवा भाजले जातात. त्याचबरोबर भाज्यांसाठी घरगुती मसाले वापरले जातात. त्यामुळे येथील जेवण हे आरोग्यपूर्ण असते.

तरी आपण एकदा अवश्य हॉटेल राजधानीला भेट द्या. एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल आणि जेवणाचा मनमुराद आनंद घ्याल. तसेच तुमचा आणि तुमच्या कुटुंबातील कोणाचाही वाढदिवस असेल किंवा मित्र परिवारातील वाढदिवस असेल तर जेवणाच्या पार्टीसाठी हॉटेल राजधानीला पसंती देऊन तुमची सेवा करण्याची संधी हॉटेल राजधानीला द्यावी. कोणतीही जेवणाची पार्टी असेल तर कृपया आम्ही खाली नंबर देत आहे त्या नंबरवर दोन तास अगोदर पार्टीची ऑर्डर द्यावी.
पत्ता: माळशिरस म्हसवड रोड गोरडवाडी, ता माळशिरस,जि सोलापूर, संपर्क – श्री शशिकांत कोकरे 9623800981, 8329304613

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
