होमिओपॅथिच्या राजाश्रयासाठी प्रयत्नशील राहणार – महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी

पुणे (बारामती झटका)

रविवार दि. 27 मार्च 2022 रोजी मिशन होमिओपॅथी संघटना महाराष्ट्र राज्य व आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड हीलींग सेंटर, पिंपरी, पुणे येथे अकराव्या शास्त्रशुद्ध होमिओपॅथी कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासक डॉ. सोमनाथ गोसावी यांनी होमिओपॅथि शास्त्र हे लोकाश्रयावर टिकून असून त्याच्या राजाश्रयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ. अमरसिंह निकम यांनी स्‍वकर्तृत्‍वातून उभा केलेले आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल ही होमिओपॅथीची पंढरी असल्याचे सांगत डॉ. निकम यांनी केलेल्या कार्याचा, कामाचा गौरव करत त्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर शासन स्तरावर होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय नोक-या मिळाव्यात यासाठी शासन दरबारी आमदार विक्रम काळे, होमिओपॅथीचे नेते डॉ. अरुण भस्मे, पृथ्वीराज पाटील, डॉ. बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. होमिओपॅथिक कार्यशाळेतून घडणारे भावी होमिओपॅथी डॉक्टर्स हे आपापल्या भागात जाऊन होमिओपॅथीचा प्रचार व प्रसार करतील. महाराष्ट्र होमिओपॅथीक परिषदेचा असणारा जादा अतिरिक्त दंड हा कमी करणार असल्याचे सांगत होमिओपॅथीच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले. यावेळी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅमुअल हनीमन व कै. डॉ. दत्तात्रय निकम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेस प्रारंभ झाला.

यावेळी व्यासपीठावर डॉ. अमरसिंह निकम, डॉ. बाळकृष्ण गायकवाड, डॉ. प्रतीक तांबे, डॉ. अमित भस्मे, डॉ. अजय तायडे, डॉ. संतोष जयस्वाल, डॉ. मनिष निकम, डॉ. सौ. मनस्वी निकम, डॉ. सुचित्रा निकम, डॉ. कमल रामचंदानी इत्यादी होते. महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे सदस्य डॉ. प्रतिक तांबे यांनी डॉ. अमरसिंह निकम यांनी लिहिलेल्या ‘व्हायटल फोर्स ऑक्सिजन’ हे पुस्तक होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात येण्यासाठी नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथी नवी दिल्ली यांना पत्र व्यवहार करणार असल्याचे सांगितले. व कार्यशाळेसाठी आलेल्या नवोदित होमिओपॅथिक डॉक्टरांना याठिकाणी ऊर्जा मिळेल असे सांगत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यापीठ नाशिकचे सिनेट सदस्य तथा प्राध्यापक डॉ.डी वाय पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज पिंपरी, पुणेचे डॉ. अमित भस्मे यांनी डॉक्टर रुग्ण नात्यांमध्ये डॉक्टरांचा रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सहानुभूतीपूर्वक असणे गरजेचे आहे असे सांगत नॅशनल कमिशन ऑफ होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमाची पुनरावृत्तीची प्रक्रिया चालू असून त्याच्या अनुषंगाने होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय NCHच्या वेबसाईटवर नोंदवून होमिओपॅथीच्या पुढील विकासासाठी हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी व मिशन होमिओपॅथिचे सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड यांनी डॉ.अमरसिंह निकम यांच्यामुळे होमिओपॅथी शिकू शकलो याचा अभिमान असून शास्त्रशुद्ध होमिओपॅथीच्या कार्यशाळा या होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये आयोजित केल्यामुळे आंतर रुग्णांच्या लक्षणांचा व्यवस्थित अभ्यास करून योग्य औषध निवड केली जाते, आंतररुग्ण हे अति दुर्धर आजाराने पीडित असल्याने अशांचा अभ्यास करून तयार झालेला नवोदित होमिओपॅथिक डॉक्टर हा नक्कीच भविष्यामध्ये चांगला होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून उदयास येऊ शकतो, त्यामुळे अशा कार्यशाळेचा जास्तीत जास्त होमिओपॅथिक डॉक्टरांनी लाभ घ्यावा असे सांगितले.

पुणे जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अजय तायडे यांनी डॉ.अमरसिंह निकम सर यांनी उभे केलेले होमिओपॅथिक हॉस्पिटल हे होमिओपॅथिक शास्त्राची पंढरी असून या ठिकाणी आले की समाधान मिळते, तसेच नवनवीन आजाराचे होमिओपॅथिक रुग्ण येथे बघावयास मिळतात त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो,कार्यशाळेसाठी आलेल्या डॉक्टरांनी सुद्धा येथील रुग्णांचा सखोल अभ्यास करून आपला आत्मविश्वास वाढवावा असे सांगितले.

मुंबईचे होमिओपॅथिक तज्ञ डॉ. संतोष जयस्वाल यांनी यावेळी मीसुद्धा 1992 साला पासून डॉ. निकम सर यांच्यामुळे प्रभावित होऊन होमिओपॅथिक प्रॅक्टिसला सुरुवात केली व आज चांगल्या प्रकारे डॉ.अमरसिंह निकम सरांच्या मुळेच मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करत असल्याचे सांगत याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून कार्यशाळेतील आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

मिशन होमिओपॅथी व आदित्य होमिओपॅथी हॉस्पिटल पिंपरीचे सर्वेसर्वा डॉ. अमरसिंह निकम यांनी होमिओपॅथी शास्त्र जगाला समजावे यासाठी मी सोप्यात सोप्या पद्धतीने होमिओपॅथि कशी करता येईल व चांगले होमिओपॅथी डॉक्टर कसे घडवता येतील यासाठी प्रयत्न करत असून होमिओपॅथि शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी होमिओपॅथी शास्त्राचा अवलंब करावा व होमिओपॅथीची प्रॅक्टिस करावी.बाकीच्या शास्त्राला जे जमले नाही ते शास्त्रशुद्ध होमिओपॅथिक उपचार पद्धतीमुळे सहज शक्य होते, हे मी माझ्या तीस चाळीस वर्षाच्या प्रॅक्टिसच्या अनुभवाने सांगतो,आजपर्यंत हजारो होमिओपॅथिक डॉक्टर्स माझ्या हातून घडून गेले असून ते आपआपल्या भागात चांगली सेवा देत आहेत असे सांगितले.

कार्यशाळेसाठी देशभरातून 50 डॉक्टरांनी सहभाग नोंदवला असून ही कार्यशाळा दोन महिन्यातून दोन दिवस अशी वर्षभर चालणार आहे.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. साई चिंता, डॉ.निलेश जंगले,डॉ.सुहास राऊत,डॉ.अश्विन कुमार काळे,डॉ. मुकेश मुसळे, डॉ.राहुल जाधव, डॉ.पांडुरंग काळे डॉ. मयुर काकडे, डॉ. श्रीकांत लंगडे,डॉ. शाम प्रसाद पावसे, डॉ.आशिष दरुरे, डॉ.सागर माने, डॉ.अनिल नवथर इ. परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकेंद्रीय दूरसंचार मंत्री देवुसिंग चौहान यांचा माळशिरस तालुक्यातील भाजपच्या वतीने सन्मान संपन्न.
Next articleडाळिंब दशा आणि दिशा भाग – २ सतीश कचरे मंडळ कृषी अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here