माळशिरस तालुका होमिओपॅथी असोसिएशनच्या संचालकांचा सन्मान भाईनाथ बचत गटाच्यावतीने संपन्न…
वेळापूर (बारामती झटका )
माळशिरस तालुका होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनच्या माळशिरस तालुका संचालकपदी माळीनगर येथील डॉ. संभाजी महादेव हाके व वेळापूर येथील डॉ. अमरसिंह अप्पासाहेब माने देशमुख यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेळापूर भाईनाथ बचत गटाच्यावतीने वेळापूर येथील शिवराज कलेक्शन या ठिकाणी सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी नेते संदिप माने देशमुख, उद्योजक नितीन शेठ पांचपूड, प्रगतशील शेतकरी विष्णू आबा काळे, उघडेवाडी गावचे उपसरपंच नितीनभैया चौगुले, ग्राहक सेवा व बहूउद्देशिय संस्था महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष भारत (नाना) कोळपे, डॉ. अमोल घोरपडे, शहाजी इंगळे, नानासाहेब काटे, दत्ता शिवपालक, सोमनाथ सावंत आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. संभाजी हाके बोलताना म्हणाले कि, होमिओपॅथीला राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन. तसेच होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन डॉक्टर संभाजी हाके यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng