माळशिरस (बारामती झटका)
सालाबादप्रमाणे याही वर्षी आखिल भारतीय होलार समाज संघटना माळशिरस तालुका व होलार समाज यंग ब्रिगेड ग्रुप यांच्या वतीने होलार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र भेट देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्कारास पात्र असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. नंदकुमार केंगार साहेब आणि होलार समाज यंग ब्रिगेडचे मार्गदर्शक नेते मा. दादासाहेब नामदास यांनी केले आहे.

माळशिरस तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अखिल भारतीय होलार समाज संघटना गेली 24 वर्षे झाली करत आहे. याला यावर्षी 25 वर्षे पुर्ण होत आहेत, तरी या सत्कार समारंभाला समाजातील सर्व दहावी, बारावी, पदवीधर, सेट, नेट, डॉक्टर, इंजिनिअर आदी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng