होलार समाजास माळशिरस पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी – युवा नेते दत्ताभाऊ ढोबळे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी सुद्धा होणार समाजाला संधी मिळालेली नाही. मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गटातील पक्षाने विचार करावा होणार समाजाची अपेक्षा आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी पक्षांमधील असणाऱ्या नेते मंडळींनी होलार समाजास माळशिरस पंचायत समिती मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी सुद्धा होलार समाजाला जिल्हा परिषद नव्हे पंचायत समितीमध्ये तरी स्थान मिळावे अशी अपेक्षा होलार समाजाची असल्याचे होलार समाजाचे युवा नेते दत्ताभाऊ ढोबळे यांनी बारामती झटक्याशी बोलताना समाजाची खंत व्यक्त केली.
माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोधी गट यामध्ये आज पर्यंतचे राजकारण चालत आहे दोन्हीही गटाने होलार समाजाचा फक्त वापरच करून घेतलेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये 35 ते 40 हजार होलार समाजाचे मतदान आहे. होलार समाजाने कोणत्याही पक्षात राजकीय गटात असतील तेथे प्रामाणिकपणे राजकीय नेते मंडळींच्या पाठीशी खंबीरपणे निस्वार्थीपणाने उभे राहिलेले आहेत . होलार समाजामध्ये अनेक तरुण सुशिक्षित आहेत सामाजिक कार्याची जाण असणारी आहेत कितीतरी उद्योग व्यवसाय नोकरी क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ आहेत. होलार समाजाच्या अनेक बैठका मेळावे झालेली आहेत. सर्व होलार समाज एकवटला आहे बांधवांची इच्छा आहे पंचायत समिती फोंडशिरस किंवा कोळेगाव अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी. दोन्हीही पंचायत समितीमध्ये होलार समाजाचे मतदान जास्त आहे तेथील होलार समाज सुज्ञ व सदनशील आहे मोहिते पाटील गट किंवा मोहिते पाटील विरोधी गटाने कोणीही उमेदवारी दिली त्यांच्या पाठीशी होलार समाज ठामपणे उभा राहणार आहे दोन्हीही गटाने आमचा विचार न केल्यास तालुक्यातील होलार समाज वेगळा विचार करणार असल्याचे मत युवा नेते दत्ताभाऊ ढोबळे यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात बारामती झटक्याशी औपचारिक चर्चा करताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपत्र व्यवहार करून चालणार नाही पत्याश्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.
Next articleपिरळे पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षामधून युवा नेते दिपक शिंदे सर इच्छुक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here