हौसेनं केला पती, तो निघाला रोगपती… अशी अवस्था नातेपुते नगरपंचायतीच्या विकासकामांची झाली…

नातेपुते येथील ऑफिसर कॉलनीची ओळख नव्याने लाल माती कॉलनी झाली.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याकरता ग्रामस्थांनी अनेक दिवस साखळी उपोषण केलेले होते. ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायत झाल्यानंतर गावचा विकास होईल असा समज होता. मात्र, तो समज गैरसमज झालेला आहे. हौसेनंन केला पती, अन तो निघाला रोगपती… अशी अवस्था नातेपुते नगरपंचायतीच्या विकासकामांची झालेली आहे. नातेपुते येथील ऑफिसर कॉलनीची ओळख नव्याने लाल माती कॉलनी झालेली आहे. संतप्त स्थानिक नागरिक, मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर यांना भेटून जाब विचारणार असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

नातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत ऑफिसर कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये सुशिक्षित व नोकरदार वर्ग राहत आहे. सदर ठिकाणी चिखल होत असल्याने नगरपंचायतीकडून मुरूम टाकण्याऐवजी लाल माती टाकलेली आहे. लाल मातीमुळे चिखल झालेला आहे. लहान मुले व वयोवृद्ध यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकजण घसरून पडले आहेत. त्यामुळे संतप्त नागरिक मुख्य कार्यकारी अधिकारी माधव खांडेकर यांची भेट घेणार आहेत.

सदरच्या परिसरामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय कोरटकर, पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील धनंजय देशमुख, बाबर सर, कुटे सर, तांबोळी सर, माळी सर, रासकर सर, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी कदम साहेब, करडे साहेब यांच्यासह अनेक नोकरदार वर्ग कॉलनीमध्ये राहत आहे. सुशिक्षित लोकांच्या कॉलनीमध्ये असा प्रकार आहे तर अशिक्षित लोकांच्या कॉलनीत काय अवस्था असेल, याची कल्पना मुख्याधिकारी यांना व्हावी यासाठी स्थानिक नागरिक नगरपंचायतीमध्ये धाव घेणार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleश्री शंकर सहकारी साखर कारखान्याची थकीत एफआरपी व कामगारांचे थकीत वेतन त्वरित द्यावे – दत्ताभाऊ भोसले.
Next articleआमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी स्वीकारले सदाशिवनगर व पुरंदावडे गावचे पालकतत्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here