ह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तन होणार.

स्वर्गीय लक्ष्मणतात्या नागनाथ भांड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.

नातेपुते (बारामती झटका )

नातेपुते येथील प्रगतशील बागायतदार व व्यापारी स्वर्गीय लक्ष्मणतात्या नागनाथ भांड यांचे प्रथम पुण्यस्मरण रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ निमित्त ह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुते यांचे सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत नातेपुते येथील कवितके सांस्कृतिक भवन येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीमती सुमन लक्ष्मण भांड, श्री. घनश्याम लक्ष्मण भांड, ॲड. धनंजय लक्ष्मण भांड आणि समस्त भांड परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नातेपुते नगरीचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य स्वर्गीय रामदादा नागनाथ भांड व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रशेखर भांड यांचे लक्ष्मणतात्या भांड बंधू होते. समाजकारण, राजकारण व उद्योग व्यवसायामध्ये भांड परिवार असतात. त्यांच्या परिवारांमधील लक्ष्मण तात्या भांड याचे गेल्या वर्षी वार्धक्याने दुःखद निधन झालेले होते. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादास उपस्थित राहावे, असे ॲड. धनंजय लक्ष्मण भांड व समस्त भांड परिवार यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात 35 गावांमधील मतदारांची दुसऱ्यांदा दिवाळी साजरी होणार.
Next articleमाळशिरस विधानसभेचे आ. राम सातपुते यांची स्व. बकुळाबाई सुळ पाटील यांच्या परिवाराची सांत्वन पर भेट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here