नातेपुते ग्रामपंचायतचे सेवानिवृत्त कर्मचारी व स्वस्त धान्य दुकान मालक स्वर्गीय आत्माराम शंकर टकले यांचे टिळक चौक येथील निवास्थानी पुण्यस्मरण कार्यक्रम.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत कार्यालयांमधील सेवानिवृत्त कर्मचारी व स्वस्त धान्य दुकान मालक स्वर्गीय आत्माराम शंकर टकले यांचे सोमवार दिनांक 04/10/ 20 21 रोजी प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह भ प गणेश महाराज भगत नातेपुते यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी 10 ते 12 या वेळेत नातेपुते येथील टिळक चौकात टकले यांच्या निवास्थानी होणार आहे.

नातेपुते येथे आत्माराम शंकर टकले व शारदाबाई आत्माराम टकले सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील दांपत्य होते परस्थिती हलाखीची व गरिबीची अशावेळी नातेपुते ग्रामपंचायत मध्ये आत्माराम टकले यांनी प्रतिकूल परिस्थितीत दहा वर्ष ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून इमाने इतबारे सेवा केली त्याचेच फळ म्हणून त्यांना तत्कालीन गावातील नेतेमंडळी व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने स्वस्त धान्य दुकान चालविण्याची संधी मिळाली त्यांना प्रकाश ,किरण, जयश्री, रमेश असे तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. परिवारातील सर्व गरीब परिस्थिती ची जाण असल्यामुळे छोट्या-मोठ्या व्यवसायामध्ये प्रपंचाचा रहाट गाडा सुरू आहे. प्रकाश यांचा गोळ्या बिस्किटाचा व्यवसाय आहे किरण स्वस्त धान्य दुकानांमध्ये मदत करीत होते तर रमेश भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी येथे कारखान्यात नोकरीत आहेत जयश्री यांचा विवाह इचलकरंजी येथील राजेश मुसळे यांच्याशी झालेला आहे गुण्यागोविंदाने मुलांचा व मुलींचा संसार सुरू होता दिवसेंदिवस कष्टावर आर्थिक परिस्थिती सुधारत चाललेली होती दिवस चांगले येऊ लागलेले होते अशातच काळाने घाला घातला एक वर्षा पूर्वी टकले परिवार यांचा आधारवड कोसळला आत्माराम टकले यांचे दुःखद निधन झाले. काळ थांबत नसतो बघता बघता वर्ष झाले त्यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कोरोना गंभीर परिस्थिती असल्याने ठराविक व मोजक्या मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये कोरोना चे नियम पाळून प्रथम पुण्यस्मरण याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.